रंगपंचमी झाडांची
धुळीने माखलेल्या झाडांना नैसर्गिक रंग परत मिळाला.
धुळीने माखलेल्या झाडांना नैसर्गिक रंग परत मिळाला.
संगम हायटेक नर्सरीच्या ट्री ॲम्बुलन्सच्या माध्यमातून पाण्याच्या फवारयाने झाडे धुवून घेण्यात आली. सोबत पाण्यामध्ये औषधी व झाडांच्या वाढीकरीता जीवनसत्त्वे मिसळून झाडांवर फवारणी करण्यात आली. तहसील कार्यालय ते महात्मा गांधी चौक, महात्मा गांधी चौक पुतळा परिसर येथील सर्व झाडे पाण्याच्या प्रेशर ने धुवून घेतली. झाडांसोबत रंगपंचमी साजरी करण्यात आली. धुळीने माखलेल्या झाडांना नैसर्गिक रंग परत मिळाला, झाडांना चकाकी मिळाळी, झाडे टवटवीत झाली.
याबरोबर भुयारी मार्गातील कुंडी, तहसील कार्यालय ते महात्मा गांधी चौक सर्व झाडे, महात्मा गांधी चौक ते हनुमान चौक ते गंजगोलाई रस्ता दुतर्फा सर्व झाडे, मुख्य बस स्थानकातील सर्व झाडे या सर्व झाडांना तीन वेगवेगळ्या टीम सदस्यांनद्वारे तीन टँकरद्वारे पाणी देण्यात आले.
शहरातील सर्व झाडे ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून जगवली जात आहेत. सतत २२ महिन्यांपासुन म्हणजे अविरत ६७१ दिवसांपासुन ग्रीन लातूर वृक्ष टिम शहरात वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करत आहे. त्यामुळे लातूरचे हरित आच्छादन वाढले आहे.
हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. पवन लड्डा, मनपा नगरसेवक इम्रान सय्यद, ॲड. वैशाली यादव, गंगाधर पवार, रुषीकेश दरेकर, मनमोहन डागा, प्रमोद निपानीकर, शिवशंकर सुफलकर, सुलेखा कारेपुरकर, आशा अयाचित, प्रिया नाईक, बळीराम दगडे, शुभम आवाड, सुरज पाटील, युगा कनामे, महेश गेलडा, सिताराम कंजे, विजयकुमार कठारे, मोईझ मिर्झा, खाजाखॉ पठान, प्रसाद जाधव, अनुराधा पुंडकर,शेख फारुक, असिफ तांबोली यांनी परिश्रम घेतले..
🌳ग्रीन लातूर वृक्ष टीम🌳
DR. LADDA PAVAN
PADMA NAGAR, BARSHI ROAD,
LATUR[MAH] 413531
CELL 09326511681


0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.