भूमिपुत्रांचे बाळासाहेब : समाजाला आत्मभान देणारी कविता. डॉ. कैलास दौंड

 

भूमिपुत्रांचे बाळासाहेब : समाजाला आत्मभान देणारी कविता.

डॉकैलास दौंड







   

भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर यांचे महान  कार्य भारतातील सर्व माणसाच्या उन्नतीचे आणि सर्वांगीण  प्रगतीचे आहेसामाजिक समतेचे आणि विषमता निर्मुलनाचे आहेत्यांचे संपूर्ण जीवनच समाजासाठी समर्पित होतेत्यामुळे अनेकांनी त्यांच्या कार्याला समजून घेत त्यावर ग्रंथनिर्मिती केली आहेमुळातच महाकाव्याचा विषय असणाऱ्या  डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या संबंधाने  काहींनी काव्यग्रंथही निर्माण लिहीले आहेतभूमिपुत्रांचे बाबासाहेब ही कवी चंद्रशेखर मलकमट्टे यांची दीर्घ कविता १४ एप्रिल २०१० रोजी पुण्यातील सुविद्या प्रकाशनाने प्रकाशित केली असुन तिची दुसरी आवृत्ती १४ ऑक्टोबर २०२० रोजी ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केली आहे." डाॅबाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर बहुजन - ओबीसींसाठी जे कार्य केले ते लोकांसमोर यावे या हेतुने ' भूमिपुत्रांचे बाबासाहेब ' हे दीर्घ काव्य लिहीले " असे कवीने मनोगतात लिहीले आहेभूमिपुत्रांना अंतर्मुख करणारी कविता असे या कवितेला संबोधता येइल.

   

          प्रसिद्ध कवी यशवंत मनोहर यांची एकवीस पृष्ठाची 'बाबासाहेबांच्या करूणेचे अथांग तारांगणया शीर्षकाची प्रस्तावना कवी मलकमपटटे यांच्या दीर्घ कवितेची बलस्थाने दर्शवणारी आहे.प्रस्तुत दुसर्या आवृत्तीत पहिल्या आवृत्तीची डाॅरावसाहेब कसबे यांनी लिहीलेली प्रस्तावनाही समाविष्ट केलेली आहेया प्रस्तावनेच्या शेवटी डाॅकसबे यांनी 'चंद्रशेखर मलकमट्टे यांची कविता म्हणजे या नव्या सुज्ञ पिढीच्या आगमनाची चाहूल आहेजिच्या आगमनाची उत्कंठतेने वाट पाहिली ती सूज्ञ पिढी सामाजिकआर्थिक क्रांतीसाठी पुढे येत आहे याचा मनस्वी आनंद आहे. ' असे अत्यंत स्वागतशील आणि मौलिक विधान केलेले आहेते औचित्यपूर्ण आणि महत्त्वपूर्ण आहे.

      'भूमिपुत्रांचे बाबासाहेबही ७७ पृष्ठाची २० भागातील कविता डॉबाबासाहेबांनी दलितेतरांसाठी केलेल्या काही कार्याला उजागर करणारी आहेवास्तवात प्रज्ञासूर्याला   पूर्णांशाने समजून घेणे हे मोठे अवघड आणि आव्हानात्मक काम आहेही कविता तो प्रयत्न करतेया कवितेच्या सुरुवातीलाच हैद्राबाद संस्थान मुक्तीला डाॅबाबासाहेबांनीच 'पोलिस ॲक्शन'  हे नाव दिले होते आणि स्वतंत्र भारताचे वकिल म्हणून त्यांनी कामही केले होते असे कवी नोंदवतो.

जिरवून निजामाला मुत्सद्देगिरीच्या आखाड्यात

तुम्ही आणलीत आबादानी

जिथवर पसरलं होतं हैदराबाद संस्थान

त्या संपूर्ण इलाख्यात. ..' ( पृष्ठ ४४)

कष्टकरीशेतकरीमजूर यांची वास्तवातील आजची व्यथा सांगुन कवी मलकमपट्टे पुढे लिहितात -

ज्यांना उमजलं तुमचं जेतवन

त्यांचा झाला उध्दार

दिसला नाही आम्हाला कधी

तुमच्या विहाराचा  घुमट

म्हणून चाचपडतो आहोत

रात्रीच्या घनगर्द अंधारात ' (४७)

   कवी बाबासाहेबांना पुन्हा येण्याचं आवाहन करतोअसे करणे म्हणजे त्यांच्या शिकवणूकीची आणि त्त्वांचीविचारांचीकृतीची गरजच अधोरेखित करणे असतेही गरज सतत वाढती आहेप्रसंगी कवीचे भावनिक होणेही जाणवत राहते.

ज्यांना व्यवस्थेने नाकारलं

त्यांची भाषा बोललात तुम्ही!

दलित आदिवासी बहुजनांची

आशा बनलात तुम्ही! '( ५१)

     डॉ.बाबासाहेबांनी सहज सोप्या शब्दात शेतीचे अर्थशास्त्र अभिव्यक्त केलयशेतीवरील कराची रचना कशी असावी ते त्यांनी सांगितले ,  हे कवी कवितेत उतरवतोत्याच बरोबर बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतरची स्थिती -

सार्याच पक्षाचा     चालू हा धिंगाणा

आमच्या अंगाना     फक्त माती '

   या शब्दात नोंदवतांना दिसतो. ' भारतातील शेतकर्यांनो एक व्हा. ' अशी बाबासाहेबांनी हाक दिली  पण शेतकरी जातीपातीतही अडकलेले असल्याने एक होऊ शकले नाहीतकवी परखडपणे लिहीतो - ' जातीच्या कोरड्या या अभिमानाला  कुरवाळणारे आम्ही  कधी होणार शेतकरी म्हणून एक? ' ' जबाबदार सरकारचे दायित्व ' या निबंधाच्या अनुषंगानेही कवी व्यक्त होतो.

 

'दशावतारी नाटकातला बळी

जाताना वामनाच्या पायाखाली

टाळ्या वाजवणारे आम्ही. ..

बाबासाहेब,

आमचं डोकं

ठिकाणावर आणलं तुम्ही! '( ६९)

कवीचे असे लिहिणे भूमिपुत्रांना भान देणारे ठरते.

इथं सगळेच म्हणतात तुम्हाला

घटनेचे शिल्पकार

घटनेतील कलमांचं वाटतं साऱ्यांनाच आकर्षण

त्यांना काय माहीत

घटनेतील कलमं आणता येतात

इकडून तिकडून

ती कलमं रचण्यात नव्हतं

तुमचं द्रष्टेपण

तर तुम्ही बंद केल्या सार्या चोरवाटा

तुमच्या लेखणीने

हे होतं तुमचं म्हणून असणारं

खास वेगळेपण

म्हणून तर

इतक्या वेळा होऊनही घटनादुरुस्ती

तुमच्या माघारी

कुण्या प्रतिगामी मनोवृत्तीला

भेदता आली नाही

घटनेच्या पुरोगामित्वाची  चौकट ' (११८)

 

असे वाचतांना वाचक कवीला नेमके काय म्हणायचे आहे या बाबद क्षणभर संभ्रमित होतो खरामात्र कवीने प्रारंभीच्या 'मनोगतातम्हटल्याप्रमाणे 'या काव्यातुन मी माझ्या आकलनानुसार मला समजलेले बहुजनवादी  भूमिपुत्रांचे डाॅबाबासाहेब आंबेडकर रेखाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. ' या विधानातुन हा संभ्रम दूर होतो.

     डाॅबाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या भूमिपुत्रांसाठी जे कष्ट घेतलेएकुणच समाजाच्या उत्थानासाठी जे उपाय दिले ते आपण समजून घेतले नाहीते अंगीकारले नाहीत्यामुळे आपले भागध्येय नि वास्तव बदलले नाहीमात्र आता तरी ते अंगीकारावे लागतीलअशी कवीची भावना आहे आणि हेच या दीर्घ कवितेचे मुख्य आशयसुत्र आहेकवी बाबासाहेबांच्या कार्याचाधोरणांचासुधारणांचा पुनरुच्चार करतो आहेत्यातुन भूमीपुत्रांना नवे भान देऊ पाहत आहेआजच्या बिकट परिस्थितीची कारण मीमांसा करतो.  त्यासाठी तो विद्रुप झालेल्या सद्यस्थितीचे चित्रण करतो आणि डॉबाबासाहेबांचे कृषीशेतसारासावकारकीसहकारी पतपेढ्या आणि खरेदीविक्री मंडळ स्थापणे  आदी संबंधीचे चिंतनमागण्या आणि विचार यांचा जागर केला असता त्यांना समजून घेतले असतेप्रत्यक्षात आणले असते तर अशी स्थिती निर्माण झाली नसती हे कवी प्राधान्याने मांडतो.

मुळातुन वाचावी,  समजून घ्यावी अशी ही दीर्घ कविता आहेकवीचे डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आवश्यकता पटवून देणेते समाजाला सद्यकालाचे भान देत समजावून सांगणे ही महत्त्वाची कृती आहेत्यासाठी भावनाशील आणि भिडणारा कविता प्रकार निवडणे देखील औचित्यपूर्ण ठरले आहेमुक्त छंद आणि अष्टाक्षरीषडाक्षरी छंदाचा प्रभावी वापर कवीने केलेला आहे.

 

•‍ भूमिपुत्रांचे बाबासाहेब : दीर्घ कविता

 कवी : चंद्रशेखर मलकमपटटे

 द्वितीय आवृत्ती : १४ ऑक्टोबर २०२०

 प्रकाशक : ग्रंथालीमुंबई १६

 पृष्ठे : १२० • मूल्य : १२५ ₹.

~~

लेखन

डॉकैलास दौंड

kailasdaund@gmail.com

Mo 9850608611

------------------------



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या