*मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक व कुशल संघटक मरहूम अ.लतीफ नल्लामंदू*
यांना श्रध्दांजली -खिराजे अकिदत !
1976 ते 1982 या कालावधीत मी सोलापूर महापालिका स्कूल बोर्ड सदस्य होतो. जनाब अ.लतीफ नल्लामंदू हे उर्दू एक नंबर शाळेत शिक्षक होते. परंतु शिक्षकांच्या प्रश्नावर मी पूर्वी पासूनच चळवळीत होतो. त्यामुळे मौ ..का. पीरजादे, अल्लाबक्ष चितापूरे, लवंगे गुरुजी, कलशेट्टी, रजाक तोदलबाग,लतीफ नल्लामंदू हे अधून-मधून भेटत असत. शिक्षकांचे अनेक प्रश्न मी बोर्डात नेहमी मांडत होतो.
एकदा मी शाहीर अमर शेखच्या स्मृती निमित्त एक लेख लिहिला होता. ते वाचून ते माझ्याकडे आले व म्हणाले, सर, मला लेख आवडला, पण शाहीर अमर शेखांचे मूळ नाव महिबूब पटेल आहे व मी बार्शीत असताना त्यांचे मुळ नाव शोधले व एकदा शाहिराना मी बार्शीत असताना त्यांच्या सत्कार केला तेव्हा त्यांनी शाळेला रेडिओ भेट देण्याचे कबूल केले व त्याप्रमाणे थोड्याच दिवसात त्यांनी शाळेला रेडिओ व घड्याळ पाठवून दिलेला होता. शाहीर अमर बार्शीचे , हे मला माहित होते, पण त्यांचे मूळ गाव महिबूब पटेल होते हे ऐकून मी चाख पडलो.
या निमित्ताने ते मला भेटत असत. 1987 साली सोलापूरला डॉ. रावसाहेब कसबे भेटले यांच्या अध्यक्षतेखाली दलीत साहित्य संमेलन झाले ,मी सा. शबाब काढले तेव्हा त्यांना मी भेटलो ,. तेथे माझी भेट झाली व मुस्लिम मराठी साहित्यावर चर्चा करत असताना मी सहज बोलून गेलो की, मुस्लिम मराठी साहित्य संमेलन भरवले पाहिजे. त्या वर नल्लामंदू आनंदित झाले व नंतर त्यांनी संमेलनाबाबत माझा पिच्छाच काढला व 1990 साली पहिले अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य संमेलन झाले, त्यानी पहिला वाटा उचलला होता. स्व एमसी शेख , हाजी यु .आ . सिद्दीकी , आणि दै. संचारचे संपादक रंगा अण्णा यांची माझी भेट घालून दिली व त्या ,तिघांनीही भोजनाची जबाबदारी पार पाडली. याचे कारण ते पत्रकार संघाचे सचिव होते तसेच पत्रकार भवनसाठी मठपती व त्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले होते.
अ.भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषदेचे ते संस्थापक खजिनदार होते , ते उत्तम संघटक होते म्हणूनच मला स्व बेन्नूर सरांना , डॉ . मिर इस्हाक शेख , स्व नसीम मन्नान , कवी मुबारक कवि ए के शेख भाई फाटे यांना अनेक वेळा त्यांचे " कमर प्रेस " येथे अनेक वेळा एकत्र बसण्यास भाग पाडत असत यामुळेच पाहिले मुस्लीम मराठी साहित्य परिषद संपन्न झाले . त्यावेळी त्यांनी पहिल्या संमेलनाचा जो जमा . खर्च सादर केला ते पाहून त्यांचा हिशोबीपणा, प्रामाणिकपणा व अत्यंत पै-न-पै चा हिशोब त्यांनी लिहिला होता.
तसेच महापालिका व मुख्यमंत्री निधीतून देणगी मिळविण्यासाठी रमजानचे रोजे पाळून ही त्यांनी पाठपुरावा करून तो निधी मिळवला व संस्थेला स्थिरता प्रदान केली.
ते उत्तम शिक्षक होते तसेच उत्तम पत्रकारही होते. पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी शिक्षा ही भोगली होती.
त्यांचे साप्ताहिक "कासिद' हे धार्मिक विषयाला वाहिलेले होते, परंतु त्यांमध्येही त्यांनी मराठी माध्यमावर मुस्लिमांना इस्लामचे स्वरुप कळावे म्हणून मूलभूत असे लेखन करीत असत. जवळ जवळ 47 वर्षे त्यांनी संपादक पद सांभाळले नंतर त्यांचे चिरंजीव उर्दू मराठी साहित्य परिषदेचे कार्यकर्ते अय्युब नल्लामंदू यांनी ते पत्र चालवित आहेत.
एक सामाजिक बांधिलकी जपलेला, झुंझार पत्रकार, तळमळी कार्यकर्ता, मुस्लिम मराठी साहित्याचा आधारस्तंभ म्हणून ते सदैव स्मरणात राहतील.
अल्लाह त्यांना जन्नत नसीब करें अशी प्रार्थना करून मी त्यांना खिराजे अकीदत सादर करतो.
- डॉ. अजीज नदाफ
संस्थापक सचिव
अ .भा. मुस्लिम मराठी साहित्य परिषद , सोलापूर
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.