दिव्यांगाना घरपोच कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाची सोय करा
भाजपा युवा मोर्च्याचे मनपा आयुक्तांना साकडे
भाजपा युवा मोर्च्याचे मनपा आयुक्तांना साकडे
लातूर दि.29-04-2021
लातूर शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु येणार्या रूग्णांवर उपचार करणारी यंत्रणा तोेकडी आहे. परिणामी कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दिव्यांगासाठी स्वतंत्र लसीकरणाची सोय करणे गरजेचे असतानाही मनपाने याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे दिव्यांगाची गैरसोय होत आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमिवर दिव्यांगासाठी घरपोच कोव्हिड प्रतिबंधक लसीकरणाची सोय करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्तांना देण्यात आले.
कोरोनाची रूग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रूग्णांना सेवा देण्यासाठी आरोग्य सेवा तोकडी पडत आहे. त्यातच कोव्हिड-19 च्या पार्श्वभूमिवर सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेलाही म्हणावी तशी गती मिळत नाही. हे वास्तव असले तरी दिव्यांगानाही गर्दीमध्ये थांबूनच कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे लागत आहे. यासाठी काही वेळा चार-चार तास रांगेतच थांबावे लागत असल्यामुळे त्यांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने लक्ष देवून दिव्यांगाना घरपोच कोव्हिड प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर -यांच्या मार्गदर्शनाखाली मनपा आयुक्ताकडे करण्यात आली असून या निवेदनावर भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र बोकन, सरचिटणीस अमोल गित्ते, गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, संतोष ठाकूर, युवती भाजयुमोच्या लातूर सहसंयोजिका काजल पाटील, पंकज देशपांडे, सचिन कांबळे, संतोष तिवारी, नवनाथ ढेकरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.