सतत आदर्शाची मैत्री करणारे श्री संतोष बिराजदार ”.....कवि भारत सातपुते
स्वतः साठी तर कोणीही जगतं ,पण दुसऱ्यासाठी त्याग ,परिश्रम ,दान करणे एवढं सोपं नाही.
“ घरात नसले कधी कणभर दाणे
तरी दुसऱ्याच्या जात्यासाठी
गावे मनभर गाणे !”
या तळमळीने , जगणारा व माणुसकी जागवणारा एक सामान्यातला असामान्य मोहरा म्हणजे श्री संतोष बिराजदार होय. बोलके सुधारक बोलतात अन संकटकाळी अदृश्य होतात , पण कर्ते सुधारक कमी बोलतात अन कार्यरत जास्त राहतात या क्रियाशील व्यक्तिमत्वात संतोषजींचा उल्लेख करावा लागेल . प्रसिद्धीसाठी , फोटोसाठी बरेचजण काही केल्यासारखे दाखवतात परंतु अगोदर सिद्धी हि भावना इथे प्राधान्याने आहे. साने गुरुजी म्हटल्याप्रमाणे .....
“ एक हात तू नांगरणे , शतव्यख्यातून थोर
एक हात खादी विणने , मंत्र जपाहून थोर !”
असा अहोरात्र रंजला गांजल्याशी धावून जाणारा हा क्रांतिकारक अवलप्रिय सतत दुसऱ्याच्या भल्यासाठी अस्वस्थ असतो . आदर्श मैत्री फाऊंडेशन या बॅनरखाली सर्व तरुणाईने आदर्श घ्यावा व दु:खाशी मैत्री करून त्यांना काही सुख देता येते का याची पदोपदी दृष्टी असणारा व आदर्श सृष्टीची वृष्टी करणारा हा माणुसकीचा माणूस आहे.
शहीद जवानांच्या कुटूंबियांना मदत करणे, महिला पोलीस कर्मचाऱ्याचा गौरव करणे, घराघरातून रद्दी गोळा करून गोरगरिबांची दिवाळी साजरी करणे, जुने कपडे गोळा करून फाटक्या व्यवस्थेचे अंग झाकणे ,कोरोनाच्या लॉकडाऊन काळात शेकडो कुटूंबियांना मदत करणे, खचलेल्या पिचलेल्या पालकाच्या मनात शिक्षणासाठी सहकार्य करणे, समाज्यातील चांगुलपणाची दखल घेऊन त्यांना आदर्श रत्न पुरस्कार घेणे , आसि शेकडो कार्य सांगता येईल अशी
या आदर्श अश्या संतोष बिराजदार बद्दल महती वर्णन करता येईल , ज्याच्याकडे सत्ता ,संपत्ती आहे ते इतरांसाठी मदत करतातच असे नाही, पण ज्यांच्याजवळ काहीच नाही असे कर्णापेक्षा दानूत्व ज्यांच्या ठायी आहे व जी स्वतःच्या स्वप्नाची जगण्याची कवच कुंडले इतरांसाठी कवच होतात ते वर्षांनुवर्षे हर्ष देत, आदर्श पेरत , ज्यांच्या आदर्शाची कोणीही मैत्री करावी अशा तन ,मन व धनाने इतरांच्या कल्याणतच समाधान मानणारे श्री संतोष बिराजदार यांच्या या सुवासी प्रवासात हार्दिक शुभेच्छा !
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.