महात्मा बसवेश्वर जयंती रमजान ईद निमित्त
आधार प्रतिष्ठान कडून 125 बॉटल रक्तसंकलन
औसा-औसा तालुक्यातील भादा येथील आधार प्रतिष्ठान कडून दिनांक 14 मे 2021 रोजी महात्मा बसवेश्वर जयंती निमित्त आणि रमजान ईद निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास भादा व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यामुळे 125 बॉटल रक्त संकलन करण्याचा उद्देश सहज सफल झाला.
सध्या जागतिक कोरोना वायरस या महामारीमुळे देशांमध्ये खूप मोठी उपासमारी आणि व्हायरसचा रोगराईची भीती निर्माण करण्यात सरकार यशस्वी ठरले असले तरी अनेक दिवसापासून देशांमध्ये हातावर पोट असणारे आणि दैनंदिन मजुरी करूनच जीवन जगणारे लाखो नागरिक सरकारच्या या कायदेशीर कोंडीमुळे अडकून घरातच राहिले असून त्यांच्यावर सतत उपासमारीची वेळ आली आहे.
अशा नागरिकांना आधार प्रतिष्ठानने जीवनावश्यक वस्तूचा वाटप सह मास्क आदी साहित्य यापूर्वी वाटप करून आधार दिला आहे.
तर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दि 14 एप्रिल 2021 रोजी जयंती मास्क,सानिटाजर,पुस्तके देऊन साजरी करण्यात आली होती तर बसवेश्वर जयंती आणि रमजान ईद निमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास महागाव व परिसरातील नागरिकांनी भरभरून साथ दिल्याने आतापर्यंत भादा परिसरामध्ये 125 बॉटल रक्तसंकलन झाले नसल्याची माहिती असून आज झालेल्या पूर्ण महामारी तील या बिकट सावटाखाली जगणाऱ्या अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने येथे येऊन रक्तदान केले आणि या रक्तदान शिबिरास औशाचे आमदार अभिमन्यू पवार आणि टीमने तसेच औशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले आणि टीमने या शिबिरास भेट दिली आणि होणाऱ्या या रक्त संकलनाचे आणि प्रतिष्ठानचे तोंड भरून कौतुक केले हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आधार प्रतिष्ठान आणि आधार बचत गट या टीमने आर आर पाटील,प्रशांत पाटील,बालाजी उबाळे,दीपक माणधने,रियाज खोजे,मनोज पाटील,मनोज उबाळे,पांडुरंग बनसोडे,लखन लतूरे,शंशुद्दीन खोजे आणि गावातील सामाजिक कार्यकर्ते स्थानिक पुढारी यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.