हजरत खाँजा नक्शबंदी दर्गा उत्सव रद्द- दर्ग्याचे सज्जादे हाजी सय्यद मुजफ्फर अली हाशम अली इनामदार


हजरत खाँजा नक्शबंदी दर्गा उत्सव रद्द- दर्ग्याचे सज्जादे हाजी सय्यद मुजफ्फर अली हाशम अली इनामदार... 





औसा प्रतिनिधी/-  पवित्र रमजान ईदच्या दुसऱ्या दिवशी औसा येथील हजरत खाँजा नक्शबंदी दर्गा येथे बासी खुद्बा निमित्त यात्रा उत्सव प्रतिवर्षी भरवण्यात येते. परंतु जगभरात सध्या कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे, कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यावर्षी हजरत खाँजा नक्शबंदी दर्गा यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती दर्ग्याचे सज्जादे हाजी सय्यद मुजफ्फर अली हाशम अली इनामदार नक्शबंदी यांनी दिली आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरातील सर्व धार्मिक उत्सव रद्द करण्यात आले असून त्याच धर्तीवर हजरत खाँजा नक्शबंदी दर्गा येथे भाविकांची गर्दी टाळता यावी म्हणून यावर्षी यात्रा रद्द करण्यात आली असून भाविकांनी दर्शनासाठी दर्ग्यात कोणीही न येता यावर्षी घरातूनच दर्शन घ्यावे, तसेच ज्यांना दर्शन घ्यायचे असेल त्यांनी हजरत खाँजा नक्शबंदी चा संदल कार्यक्रम प्रसंगी यावे असेही दर्ग्याचे सज्जादे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. कोरोना विषाणूंमुळे जगातील महामारीचे संकट तीव्र झाले असून, धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी हजरत खाँजा नक्शबंदी दर्गा यात्रा यावर्षी रद्द करण्याचा निर्णय झाला असून भाविकांनी दर्ग्याकडे दर्शनासाठी येण्याचे टाळावे असे आवाहन दर्ग्याचे सज्जादे हाजी सय्यद मुजफ्फर अली हाशम अली इनामदार ,Adv सय्यद जुल्फेखार मन्नान अली ईनामदार, ईनामदार व नक्शबंदी परिवारांच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या