21 झाड लावून केला विवाह
आधी वृक्षारोपण, मग विवाह बंधनात
अनोखा उपक्रम; झाडे लावा झाडे जगवा दिला संदेश
औसा प्रतिनिधी
विलास तपासे
आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करत असताना वसुंधरा प्रतिष्ठानच्या कार्याने प्रेरित होऊन औसा तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी प्रा.निलेश क्षीरसागर आणि मोनिका भोजने 21 विविध प्रकारची झाडे लावून केली. या उपक्रमाचे कौतुक होत असून या माध्यमातून 'झाडे लावा, झाडे जगवा' हा संदेश देण्यात आला.
लॉकडाऊन असल्या कारणाने सध्या विवाह सोहळ्यास मर्यादित संख्येत परवानगी देण्यात आली आहे. असे असताना आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात एका चांगल्या उपक्रमाने व्हावी या हेतूने प्रा.निलेश क्षीरसागर आणि मोनिका भोजने यांनी 21 झाड लावून पर्यावरण संरक्षण काळाची गरज हा संदेश दिला. या नवं दाम्पत्याने स्वतः श्रमदान करून खड्डे केले. शिवाय, वड, पिंपळ, आंबा, चिंच, कडुनिंब अशी 21 पर्यावरण पूरक झाडे लावली. सध्या कोरोना काळात ऑक्सिजनचे महत्त्व सर्वांना पटले आहे. झाडांकडून आपण सर्वजण मोफत ऑक्सिजन घेतो त्यामुळे झाडे लावून ती जगविली पाहिजेत हा संदेश देण्यासाठी या नवं दाम्पत्याने पुढाकार घेतला आहे. केवळ वृक्षारोपण करून हे हे नवं दाम्पत्य थांबणार नसून दोघे मिळून ही लावलेली झाड जगविणार आहेत असा निर्धार त्यांनी केला.
वसुंधरा प्रतिष्ठानच्या गत सहा वर्षातील कार्याची प्रेरणा घेऊन आम्ही हा उपक्रम राबविला असल्याचे यावेळी प्रा.निलेश क्षीरसागर यांनी सांगितले. या अनोख्या पर्यावरण पूरक विवाह सोहळ्याची चर्चा झाली अन एक चांगला संदेश यातून गेला. शिवाय, उपस्थित प्रत्येक पाहुण्यांना एक वृक्ष रोप भेट देऊन झाड जगवावे असे आवाहनकेले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.