महापालिका व शिवाजीनगर पोलीस स्टेशनची संयुक्त कार्यवाही.... रिलायन्स स्मार्ट याठिकाणी 50 कामगार एकत्रितरित्या काम करत असल्याने पन्नास हजाराचा दंड


 

महापालिका व शिवाजीनगर पोलीस स्टेशनची संयुक्त कार्यवाही....

रिलायन्स स्मार्ट याठिकाणी 50 कामगार एकत्रितरित्या काम करत असल्याने पन्नास हजाराचा दंड

लातूर, दि.15(जिमाका):- जिल्ह्यात कोरोना विषाणू च्या प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशान्वये लॉकडाऊन ची कडक अंमलबजावणी सुरू आहे. तरीही लातूर शहरातील औसा रोडवरील रिलायन्स मार्ट या ठिकाणी 50 कामगार एकत्रित काम करत आहेत याची माहिती महापालिकेला  मिळाली.

      जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., महापालिका आयुक्त अमन मित्तल ,जिल्हा प्रशासन  अधिकारी सतिश शिवणे यांच्या आदेशावरून  विकेंड लॉकडाऊन असताना औसा रोड वरील रिलायन्स स्मार्ट या ठिकाणी 50 कामगार एकत्रितरित्या काम करीत असल्याचे दिसून आल्या वरून महानगरपालिका व शिवाजी नगर पोलिस स्टेशन यांनी संयुक्त कार्यवाही करून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या वेळी  झोनल अधिकारी संजय  कुलकर्णी, पोलिस निरीक्षक सुनीलकुमार  पुजारी, पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलिस नाईक गोविंद चामे,काका साहेब बोचरे राज कुमार हनमंते व महानगरपालिका स्वच्छता निरीक्षक रवि शेंडगे ,गजानन सुपेकर ,दत्ता हनमंते उपस्थित होते.

वृत्त क्र.331                                                             दिनांक:-15 मे 2021

 

लातूर महापालिककडून 9 केंद्रावर कोव्हीशिल्डचे लसीकरण करण्याचे नियोजन

लातूर,दि.15(जिमाका):-लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने वय वर्षे 45 च्या पुढील इतर नागरिकांना प्राधान्याने पहिला कोव्हीशिल्ड लसीचा डोस  महानगरपालिकेच्या 9 केंद्रावर मोफत सकाळी 10:00 ते 5:00 पर्यंत  उपलब्ध आहे. तसेच  पहिला डोस घेऊन ज्यांना 84 दिवस झाले आहेत फक्त अशा नागरिकांनी दुसरा डोस,एच.सी.डब्लू व एफ.एल.डब्लू दुसरा डोस साठी लसीकरण केंद्रावर उपस्थित रहावे असे आवाहन लातूर शहर महापालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

लसीकरण केंद्र:-

1.विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था

2.औषधाी भवन,सिग्नल कॅंम्प

3.सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,गांधी चौक

4.सरस्वती विद्यालय,प्रकाशनगर

5.यशवंत विद्यालय,साळे गल्ली

6.प्राथमिक आरोग्य केंद्र,राजीव गांधी नगर

7. कम्युनिटी हॉल

8. कै. बब्रुवान काळे आयुर्वेदिक महाविद्यालय

9.प.जवाहरलाल नेहरू मनपा रूग्णांलय,पटेल चौक

****


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या