*तपसे चिंचोली येथे कृषी विभागाकडून सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक.*

 *तपसे चिंचोली येथे  कृषी विभागाकडून  सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक.*






औसा प्रतिनिधी:-मुख्तार मणियार


शेतकरी बांधवांनी सोयाबीन पेरण्याचे ठरविले असेल त्यांनी आपल्याकडे घरीच किंवा गावातील उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाणाची उगवण चाचणी घेऊन त्यानुसारच बियाणे पेरणीसाठी वापरावे, शेतकऱ्यांनी आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करून खरीप 2021 पेरणीचे नियोजन करावे,माती तपासणी याबाबत मार्गदर्शन कृषी विभाग औसा  यांच्या कडून तपसे चिंचोली येथे करण्यात आले.

सोयाबीन सरळ वाण व स्वपरागीत पीक असल्याने बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही ,मात्र पेरणीपूर्वी उगवण चाचणी घेणे आवश्यक आहे. यासाठी सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यातून प्रातिनिधिक नमुना काढून त्यातील काडीकचरा काढून टाकून नमुना एकत्र करावा.. गोनपाट स्वच्छ धुऊन घ्यावे त्यातील एक ओला तुकडा जमिनीवर पसरावा व काढलेल्या प्रातिनिधिक नमून्यातून सरसकट 100 दाणे दिड ते दोन सेमी च्या अंतरावर 10- 10 च्या रांगेत गोनपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत. त्यावर गोनपाटाचा दुसरा तुकडा अंथरूण यावर चांगले पाणी शिंपडावे व गोणपाटाची बियाणासकट गुंडाळी करून हळुवारपणे सावलीच्या ठिकाणी ठेवून  द्यावी. अशाप्रकारे  अधून मधून त्याला पाणी शिंपडून ती गुंडाळी ओली ठेवावी. पाच ते सहा दिवसानंतर गुंडाळे उघडून चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजून घ्यावे.  सरासरी काढून 100 दाण्यांपैकी 70 किंवा जास्त दाणे उगवून आले असतील तर आपले बियाणे पेरणीस योग्य आहे असे समजावे व एकरी 30 किलो या प्रमाणात बियाणे वापरावे जर उगवणशक्ती 70 टक्केपेक्षा कमी आले तर प्रत्येक एक टक्का मागे अर्धा किलो बियाणे जास्तीचे वापरावी . अश्या प्रकारे घरच्या घरी सोयाबीन उगवण क्षमता अंदाज येतो. हि चाचणी पेरणीच्या एक-दोन आठवडे अगोदर करावी. अश्या प्रकारे प्रात्यक्षिक दाखवून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी  कृषी अधिकारी एम. जी. वाघमारे , कृषी अधिकारी कंदले ए. पी. शेतकरी  मारुती नेटके ,बालाजी शिंद, प्रवीण नेटके, दिलीप लादे, खंडू नेटके, दत्ता स्वामी, प्रशांत नेटके  माधव कांबळे ,सदानंद नेटके, उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या