जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, लातूर, संदर्भ क्र. १ ते ४ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून सदर्भ क्र. ७ अन्वये जिल्हयात लावण्यात आलेल्या कडक लॉकडाउन निर्बध कालावधीत रमजान ईद (ईद-उल-फितर) सण असल्याकारणामुळे नागरिकांना खालील बाबीसाठी मध्ये सुट देण्यात येत आहे.
१) दिनांक ११.०५.२०२१ व १२.०५.२०२१ रोजी सकाळी ०७.०० ते सकाळी १२.०० या कालावधीत फक्त रमजान ईद सणाच्या खरेदीसाठी किराणा दुकाने, डायफ्रुट्स, भाजीपाला, फळविक्री, चिकन, मटन, विक्रीचे दुकाने, अंडी, मासे, बेकरी, दुध विक्री दुकाने सुरु राहतील.
३) दिनांक १२.०५.२०२१ रोजी केवळ हातगाइयावर फिरत फळांची विक्री, दुध विक्री, चिकन / मटन विक्री सायंकाळी ०५.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत करता येईल.
३) रमजान ईद सणानिमित्त एकाच ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून आपल्या घराच्या नजीकच्या दुकानातुनच खरेदी करावे होम डिलिव्हरीला प्राधान्य दयावे. नागरिकांनी शक्यतो खरेदीसाठी वाहनाचा वापर टाळावा.
४) रमजान ईद सणानिमित्त किराणा/भाजीपाला ई साहित्य खरेदी करणेसाठी मुख्य बाजारपेठ उदा. गंजगोलाई मस्जिद रोड, भुसार लाइन, सुभाष चौक, आंबा हनुमान, खोरी गल्ली, मित्र नगर, दयानंद गेट मेन रोड, राजीव गांधी चौक
ई. बाजारपेठेत गर्दी करू नये. आपल्या कॉलनीच्या जवळच्या दुकानातूनच सामान खरेदी करावे. ५) नागरिकांची गर्दी होणार नाही यासाठी विक्री करणारे दुकानदार यांनी त्यांचे आस्थापनासमोर ठराविक शाररिक अंतर (सोशल डिस्टन्स) ठेवण्यासाठी वर्तुळ आकाराचे चिन्ह करावे. जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर वस्तू सामान आस्थापनेत दुकानातून विक्री करू नये.
६) वरील बाबीसाठी देण्यात आलेली सूट मध्ये दुकानदार व नागरिक यांनी कोव्हीड-१९ सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
७) चंद्र दर्शन नंतर रमजान ईद दिनांक १४.०५.२०२१ रोजी साजरी होणार असल्यास दिनांक १३.०५.२०२१रोजी सायंकाळी ५.०० ते सायं. ०७.०० वाजेपर्यंत डायफ्रुट्स, फळविक्री, चिकन, मटन विक्री, दुध विक्री सुरु राहतील.
८) वरील बाबी व्यतिरिक्त संदर्भ क्र. ७ अन्वये लावण्यात आलेले निर्बंध कायम राहतील.
सदरहू आदेश दिनांक ११.०५.२०२ १(वार मंगळवार) सकाळी ०७.०० वाजेपासून अमलात येईल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.