भाजपयुमोच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा

 

भाजपयुमोच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा..





भाजपायुमोचे जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना साकडे
लातूर: भाजयुमोच्या जालना येथील सरचिटणीस शिवराज नारियलवाले या पदाधिकाऱ्यांला पोलिस अधिकाऱ्यांनी केलेल्या मारहाणीची सखोल चौकशी करून यातील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याच्यावती  जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक लातूर यांना देण्यात आलेले आहे.
        जालना जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस व गवळी समाजाचे यूवा कार्यकर्ते शिवराज गोपाळ नारियलवाले हे २७ मे रोजी जालना येथील हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी गेले असता. दरम्यानच्या कालावधीत गवळी समाजातील एका युवकाचा त्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.त्यामुळे गवळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने जमले होते ती गर्दी पोलिसांनी लांबवली. दरम्यान गवळी समाजाविषयी अपशब्द वापरून गवळी समाजाची बदनामी करण्याचे काम केलेले उपस्थित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेले आहे. ती बदनामी शिवराज नारियलवाले यांना सहन न झाल्याने त्यांनी त्या घटनेची व्हिडिओ शूटिंग केली व्हिडिओ शूटिंगमध्ये पोलीस अधिकारी स्पष्ट दिसत आहेत.या भितीने डीवायएसपी यांनी शिवराज यांना  अमानुषपणे मारहाण केली. भाजपचे कार्यकर्ते शिवराज यांनी पोलीस अधिकाऱ्यांना माफीही मागितली तरी त्यांना काट्यात तुटेपर्यंत मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे समोर आलेले आहे.त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी करून यातील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर शहर जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकारी लातूर व पोलीस अधीक्षक लातूर यांना देण्यात आले. या निवेदनावर भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र बोकन, भाजप भाजयुमो सरचिटणीस सागर घोडके,गणेश गोजमगुंडे, अमोल गीते, संतोष ठाकूर, चिटणीस संतोष तिवारी,
, नवनाथ ढेकरे, दुर्गेश चव्हाण,आकाश पिटले,अजय कोटलवार ,प्रेम मोहिते,महादेव पिटले, गोविंद सुरवंशी,आकाश बजाज, पंकज देशपांडे, गणेश पवार, पुनम पंचाळ, राजश्री होनाळे, काजल जाधव, राजेश पवार, काका चौगुले, रवी लवटे, अभिजीत मुनाळे,किशोर शिंदे, यशवंत कदम, योगेश गंगणे, संकेत गवळी यांच्यासह भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांची स्वाक्षर्‍या आहेत.
 ----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या