*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या मागणीला यश*
*महापालिकेतर्फे पत्रकारांसाठी विशेष लसीकरण शिबीर*
मुंबई प्रतिनिधी :
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृत्तांकन करणाऱ्या सर्व पत्रकारांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करावे अशी मागणी, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे करण्यात आली होती. ज्याची दाखल घेत महापालिकेने शनिवारी २९ मे रोजी पत्रकारांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन केले आहे.
कोविड कालावधीत सर्वच पत्रकारांनी वृत्तांकन करताना अप्रत्यक्षपणे का होईना, आपला जीव धोक्यात टाकला आहे. कोविड संबंधित सकारात्मक वृत्त तसेच कोविड निगडित प्रशासनाच्या चुका सार्वजनिक करण्यात पत्रकारांचे विशेष योगदान आहे. त्यामुळे, पत्रकार हाही एक प्रामाणिक व निर्भीड कोविड योद्धा आहे.
वृत्तांकनासाठी पत्रकारांचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्याप्रमाणात वावर असतो. त्यामुळे पत्रकारांचे प्राण कोविडपासून सुरक्षित करणे महत्वाचे असल्याचे लक्षात घेत, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात वृत्तांकन करणाऱ्या सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांच्या प्रतिनिधींना कोविड प्रतिबंधात्मक लास देण्यात यावी. अशी मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नवी मुंबई तर्फे २० एप्रिल २०२१ रोजी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे लेखी निवेदनामार्फत संघटनेचे अध्यक्ष डी.टी. आंबेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे नवी मुंबई महानगरप्रमुख सुदिप घोलप आणि सचिव अनिलकुमार उबाळे यांच्यातर्फे करण्यात आली होती.
ज्याची दाखल घेत शनिवार २७ मे रोजी बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटल येथे पत्रकारांसाठी विशेषरित्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीराचे आयोजन सकाळी १२.३० ते संध्याकाळी ५ वाजे दरम्यान करण्यात आले आहे. तर, पत्रकारांसाठी विशेष लसीकरण शिबीराचे आयोजन केल्यामुळे, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, जनसंपर्क विभाग अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे इत्यादींचे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नवी मुंबई तर्फे आभार मानण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.