*जालना जिल्हा पोलीस अधीक्षकांची कार्यवाही अर्धवटच ?*
*मारहाण करणारे अधिकारी व सर्व कर्मचारी बडतर्फ करून त्यांचेवर गुन्हे दाखल करण्याची लोकाधिकार संघाची मागणी.*
लातुर : दि. २९ - भाजप युवा मोर्चा जालनाचे सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना अमानुषपणे मारहाण केल्या प्रकरणी जालन्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी केलेली कार्यवाही अर्धवटच असून मारहाण करणाऱ्या सर्वांनाच पोलीस खात्याच्या सेवेतून कायमचे बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
२७ मे रोजी पोलिसांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर जालना जिल्ह्याच्या पोलीस यंत्रणेवर जन माणसांमधून टीकेचा वर्षाव सुरू झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी स्वतः चौकशी करून १ पोलिस उपनिरीक्षकासह ४ पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केल्याचे आदेश काढले,
त्याबद्दल लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांचे अभिनंदन केले आहे. मात्र ही झालेली कार्यवाही अर्धवट असून मारहाण करणाऱ्या सर्वच पोलिस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यावर केवळ निलंबित नाही तर या सर्वांना सेवेतून बडतर्फ करण्यासंदर्भातली कार्यवाही करावी आणि मारहाण करणाऱ्या सर्वावर गुन्हे नोंद करावेत अशी मागणी व्यंकटराव पनाळे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.