लातूर जिल्ह्यात नागपूर पॅटर्न राबविणार-आ. संभाजी पाटील निलंगेकर
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचे लोकार्पण
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचे लोकार्पण
लातूर/प्रतिनिधी ः- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या संकट काळात जेथे रुग्ण तेथे सेवा पोहचविण्याचा पॅटर्न निर्माण केलेला आहे. या पॅटर्नमुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळालेले असून अनेकांना वेळेवर उपचार उपलब्ध झालेले आहे. हाच पॅटर्न लातूर जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रतिपादन आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले आहे.
केंद्रीयमंत्री तथा विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे नितीन गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते लातूर शहर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑक्सिजन बँकेस दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचे लोकार्पण करण्यात आले आहे. यावेळी आ. निलंगेकर बोलत होते.
सर्वसामान्यांच्या संकट काळात सेवाभाव जोपासला जावा असे आवाहन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी हे सातत्याने करीत असल्याचे सांगून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी कोरोनाच्या संकट काळातही हा सेवाभाव अधिक जोमाने जोपासला जात असल्याची माहिती दिली. विशेषतः केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर येथे कोरोना रुग्णांसाठी विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये ज्या ठिकाणी रुग्ण आहेत त्या ठिकाणी जाऊन त्याना आवश्यक असणारी सेवा देण्याचा नागपूर पॅटर्न निर्माण झालेला आहे. हाच पॅटर्न लातूर जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प आम्ही करीत असल्याचा सांगत आ. निलंगेकर यांनी याकरीता जिल्हा भाजपाचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लातूर शहर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या ऑक्सिजन बँकेस दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचे लोकार्पण करण्यात आलेले असून रक्तदान शिबीर तसेच जिल्ह्यातील विविध रुग्णालयामध्ये बायोपॅप मशीन व ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आ. निलंगेकर यांनी यावेळी दिली.
याप्रसंगी मनपाचे गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, जि.प. उपाध्यक्षा सौ. भारतताई सांळूके, युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, भाजयुमोचे शहरजिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर, चेअरमन दगडू साळूंके, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पंडीत सुकनीकर, भाजयुमोचे सरचिटणीस अमोल गिते, अॅड. गणेश गोजमगुंडे, सागर घोडके, अभिजीत मुनाळे, पुनम पांचाळ, राजश्री होनाळे, अॅड. पंकज देशपांडे, नितीन हासाळे, गजेंद्र बोकन, संतोष तिवारी, यशवंत कदम, रवि लवटे, प्रेम मोहिते, आकाश बजाज आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.