मदुरा मायक्रो फायनान्सच्या वतीने औसा पोलिसांचा सन्मान
औसा मुख्तार मणियार
मदुरा मायक्रो फायनान्स वतीने सामाजिक बांधिलकी म्हणून संकट काळात स्वतःच्या जीवाची जोखीम घेऊन लढणाऱ्या पोलीस प्रशासनाचा सन्मान म्हणून गुरुवार दिनांक 27 मे रोजी औसा पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक शिवशंकर पटवारी ,पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब डोंगरे, आणि ठाणे अमलदार शेख व अन्य सहकारी यांचा मदुरा मायक्रो फायनान्सच्या वतीने मास्क, सेनिटायझर आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. संकट काळात महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यातील 57 पोलीस ठाण्यामधून हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी मदुुरा फायनान्सचे औसा शाखेचे अधिकारी गजानन सूर्यवंशी, कर्मचारी बालाजी भोजने, ग्राहक प्रतिनिधी मिरा कठारे, सुनिता फुलारी, यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. भारतीय रिझर्व बँक मान्यताप्राप्त मदुरा ग्रामीण आणि शहरी भागातील मध्यम व गरजू महिलांना व्यवसायासाठी वआर्थिक वृद्धीसाठी अर्थसहाय्याची उत्तम सेवा देण्याकरिता कायम प्रयत्नशील आहे. या कामासोबत सामाजिक बांधिलकी अंतर्गत यापूर्वी मदुरा मायक्रो फायनान्सच्या वतीने रक्तदान शिबिर, पोलिस प्रशासनातील कर्मचार्यांचा सन्मान ,वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबिर, पूरग्रस्तांना मदत असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.