मनरेगा ग्रामसमृध्दी अभियानांतर्गत आ.अभिमन्यु पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

 मनरेगा ग्रामसमृध्दी अभियानांतर्गत आ.अभिमन्यु पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला













औसा मुख्तार मणियार

मनरेगातून_ग्रामसमृद्धी_अभियानाअंतर्गत 29 मे शनीवार रोजी औसा मतदार संघातील याकतपूर, कन्हेरी, जयनगर व महादेववाडी येथे आ.अभिमन्यु पवार यांनी भेटी देऊन शेतक-यांशी संवाद साधला. औसा तालुक्याला केशर व चिंच हब म्हणून विकसित करण्याचा माझा मानस आहे .यावेळी व्यक्त करून 'केशर आंबा लागवडीसाठी औसा तालुक्यात पोषक वातावरण आहे तसेच देशांतर्गत व देशाबाहेर चांगली बाजारपेठ सुद्धा उपलब्ध आहे. शासकीय योजनेतून शेतात सलग किंवा बांधावर केशर आंब्याची लागवड करा, त्यासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध देण्यासाठी सुद्धा आमदार अभिमन्यू पवार साहेब प्रयत्न करणार आहेत ' अशी माहिती शेतकरी बांधवांना दिली. शेतीवरील खर्च कमी करण्यासाठी व उत्पन्न वाढवण्यासाठी मनरेगाअंतर्गत सेंद्रिय खत निर्मिती प्रकल्प आणि शेततळे घ्यावे असे आवाहनही शेतकरी बांधवांना केले.


यावेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, उपविभागीय कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व शेतकरी बांधव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या