*कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी लोकाधिकार संघ व बोळेगावकर परिवाराचा मोफत निवास व भोजन सेवा उपक्रमाचा झाला शुभारंभ...*
लातुर : दि. १५ - लोकाधिकार संघ व बोळेगावकर परिवार यांचा कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था या सेवा उपक्रमाचा लातुर येथे औसा नांदेड रिंग रोड, सिकंदरपुर रोड जवळील बोळेगावकर मंगल कार्यालयात शुभारंभ करण्यात आला. अक्षय तृतीया, महात्मा बसवेश्वर जयंती, छत्रपती संभाजी महाराज जयंती, परशुराम जयंती आणी रमजान ईद या शुभ दिनी लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटरावजी पनाळे यांच्या हस्ते या सेवा उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
शुभारंभ प्रसंगी महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन सौ. शोभाताई बोळेगावकर, सिद्धलिंगआप्पा बोळेगावकर, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी लातूर जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला ते बाळासाहेब नरारे, लोकाधिकारचे जिल्हाप्रमुख वीरनाथ अंबुलगे, उपजिल्हाप्रमुख माधवराव तोंडारे, प्रशांत बोळेगावकर, किर्तीताई राजमाने, संतोष पनाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी लोकाधिकारचे राज्य कार्यकारिणी सदस्य शिवदास बुलबुले, तालुका प्रमुख जनार्दन इरलापल्ले, सादिक शेख, राम पंडगे, रमण रत्नपारखे, पवन कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
सेवा उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी बोलताना लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे म्हणाले की हा उपक्रम म्हणजे एकार्थाने ईश्वरी सेवा आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत निवास आणि भोजन व्यवस्थेचा उपक्रम सुरू करण्याची कल्पना आमच्या मनात आली तेव्हा, सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे जागा आणि निवारा याबाबतचा. प्रशांत बोळेगावकर यांच्या आई-वडिलांशी चर्चा करून मंगल कार्यालय मिळवता येईल का असा जेव्हा प्रयत्न झाला. तेव्हा भेटीमध्ये विचारल्या बरोबर प्रशांतचे आईवडील सिद्धलिंगआप्पा बोळेगावकर आणि शोभाताई बोळेगावकर यांनी आमचं स्वागत करून तुम्ही खूप चांगलं काम करत आहेत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. मंगल कार्यालय तर देवुतच. या शिवाय आमच्याकडून या कामाबाबत आवश्यक असेल ते आम्ही सर्व सहकार्य देऊ असे त्यांनी सांगितले.
कोरोना चा फटका संपूर्ण बोळेगावकर परिवाराला बसलेला आहे. यामध्ये शोभाताई बोळेगावकर यांना तर व्हेंटिलेटर लावावे लागले होते. शोभाताई यांना लातूर येथून सोलापूरच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले होते. मात्र सोलापूरच्या दवाखान्यातली परिस्थिती पाहून शोभाताई यांनी तेथे दाखल होण्यास नकार देऊन ते परत लातूरला आले. लातूर येथे येऊन आपल्या घरीच दोन दिवस राहून, पुढे लातूर येथील डॉ. गटागट यांनी त्यांच्यावर उपचार केले. आणि बोळेगावकर परिवाराने कोरोना वर मात केली. कोरोना ची लागण झाल्यानंतर या परिवाराला आर्थिक मानसिक त्रास याचा जो अनुभव आला. त्या अनुभवातूनच कोरोना रुग्णांच्या नातेवाईकाला मदत केली पाहिजे ही भावना त्यांच्या अंतकरणात जागृत झाली. बोळेगावकर परिवाराला आपण कांही तरी केले पाहिजे असे वाटत असतानाच, नेमके याच वेळी आम्ही बोळेगावकर परिवाराकडे मंगल कार्यालयाच्या मागणीसाठी गेलो आणि त्यांनी सहकार्याची भूमिका घेतली. बोळेगावकर परिवाराने सहकार्याची भूमिका दाखवल्याबद्दल लोकाधिकार संघाच्यावतीने व्यंकटराव पनाळे यांनी त्यांचे आभार व्यक्त करून धन्यवाद दिले आहेत. यातूनच लोकाधिकार संघ आणी बोळेगावकर परिवार यांचा हा कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांसाठी मोफत निवास व भोजन व्यवस्था हा सेवा उपक्रम सुरु झाला असल्याचे पनाळे यांनी सांगितले.
लातूरला केवळ लातूर शहरातीलच नाही तर लातूर जिल्ह्यातून व आजूबाजूच्या जिल्ह्यातुनही मोठ्या प्रमाणात रुग्ण लातूर येथे उपचारासाठी येत असतात. रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुरू केलेल्या सेवाकार्यात या ठिकाणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे, जिल्हाप्रमुख वीरनाथ अंबुलगे, उपजिल्हाप्रमुख माधवराव तोंडारे, शोभाताई बोळेगावकर, प्रशांत बोळेगावकर स्वतः नित्य लक्ष देणार आहेत.
याप्रसंगी बाळासाहेब नरारे यांनी या कार्याला शुभेच्छा दिल्या. तर प्रशांत बोळेगावकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप झाला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.