आक्का फाऊंडेशनच्या वतीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय संस्थेस तीन बायोपॅप मशीन
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रशासनास सुपूर्द
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रशासनास सुपूर्द
लातूर/प्रतिनिधी ः- कोरोनाची दुसरी लाट सर्वांसाठी चिंतेची बाब ठरत असून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे काळाची गरज झालेली आहे. आगामी तिसरी लाट लक्षात घेता त्या दृष्टीने आक्का फाऊंडेशन कार्य करीत असून त्या अनुशंगाने आक्का फाऊंडेशनने लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत तीन बायोपॅप मशीनस दिल्या आहेत. या मशीनस आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते विज्ञान संस्थेच्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत.
राज्यासह लातूर जिल्ह्यात ही कोरोनाची दुसरी लाट सर्वांनाच चिंतेची बाब ठरत असून ही लाट आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा कार्यरत आहे. मात्र ही आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करणे काळाची गरज ठरली आहे. विशेष म्हणजे आगामी तिसरी लाट लक्षात घेता आरोग्य यंत्रणेला मजबुत करण्यासाठी सर्वांनीच सामुहिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्या अनुशंगानेच आक्का फाऊंडेशन जिल्ह्यात कार्यरत असून आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी आवश्यक असणारी उपकरणे व साहित्य फाऊंडेशनच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. त्याचच एक भाग म्हणून लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेस तीन बायोपॅप मशीन देण्यात आलेल्या आहेत.
आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते या तीन मशिन वैद्यकीय संस्थेच्या प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी उपअधिष्ठता डॉ. शैलेंद्र चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव बनसुडे यांच्यासह युवानेते अरविंद पाटील निलंगेकर, शहर भाजपाचे संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, मनपा गटनेते अॅड. शैलेश गोजमगुंडे, प्रदेश भाजपाच्या प्रेरणा होनराव, नगरसेवक शैलेश स्वामी, शहर उपाध्यक्ष महेश कौळखेडे, राजू आवस्कर आदींची उपस्थिती होती.
जिल्हा प्रशासनाकडे आरोग्य उपकरणे व साहित्य सुपूर्द
ऑक्सफॅम इंडिया यांच्या पुढाकारातून आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या पाठपुराव्यातून उपलब्ध झालेले आरोग्य उपकरणे व साहित्य जिल्हा प्रशासनाकडे सुपुर्द करण्यात आली. सदर उपकरणे व साहित्य जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे देण्यात आलेली आहेत. या साहित्यांमध्ये दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर, 20 बेड, 250 नोझल मास्क, आयसीयु कक्षासाठी आवश्यक असणारे 4 मॉनिटर, 125 थरमामिटर, 6 बीपि मिटर, 15 ऑक्सिमिटर, 20 ऑक्सिजन फ्लो मिटर आदींचा समावेश आहे. यावेळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी कोरोनाची येणारी आगामी तिसरी लाट लक्षात घेता आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही पाठपुरावा करीत असून त्या अनुशंगाने आरोग्य साहित्य व उपकरणे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सदर साहित्य जिल्हा प्रशासनाने आवश्यकतेनुसार जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांना द्यावीत अशी विनंती केली. त्याचबरोबर लवकरच आणखी मोठ्या प्रमाणात आरोग्य उपकरणे व साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाहीही दिली.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जि.प. अध्यक्ष राहुल केंद्रे, ऑक्सफॅम इंडियाचे प्रोजेक्ट चेअरमन परमेश्वर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, चेअरमन दगडु साळूंके, माजी सभापती बापू राठोड, जिल्हा उपाध्यक्ष पंडीत सुकणीकर आदींची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.