तरुणाच्या पुढाकाराने शिवलीत उभा टाकतोय पाच कोटीचा प्रकल्प

 

तरुणाच्या पुढाकाराने शिवलीत उभा टाकतोय पाच कोटीचा प्रकल्प







 स्थानिकांना मिळणार रोजगार तर औसाचा होणार कायापालट 
औसा- अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर लातूर जिल्ह्यातील किशोर पाटील या तरुणाने पुढाकार घेऊन तालुक्यातील शिवली येथे जवळपास पन्नास कोटी रुपयांचा प्रकल्प दिनांक 14 मे रोजी पायाभरणी शुभारंभ केला आहे. लातूर जिल्ह्यातील    औसा तालुका हे नावारूपाला आलेले गाव असून येथे राजकीय-सामाजिक मंदिर संस्थान व विविध घडामोडी घडून येत असतात. भौगोलिक दृष्टीने औसा तालुका उत्तम गाव म्हणून जिल्ह्यात परिचित आहे या तालुक्यात जवळपास 132 गावे जोडली गेली असून येथील स्थानिक बेरोजगार कुशल  अकुशल कामगारांना आता रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती व्यवसायाने डॉक्टर असलेले किशोर पाटील यांनी दिली. पुढे म्हणाले की एम सी एल कंपनी अंतर्गत श्रीविद्या क्लीनफिलूस प्रायव्हेट लिमिटेड व श्री नरसिंह प्रोडूसर कंपनी औसा याची उभारणी करून पाच कोटी रुपयांचा प्रकल्प राबविणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज दहा टन जैविक इंधन तर पंधरा टन सेंद्रिय खताची निर्मिती करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
वाहतूक क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल, खनिज सीएनजी यांना शंभर टक्के पर्याय असून वाहनात कोणतेही बदल न करता हे इंधन वापरता येणार आहे तसेच याच माध्यमातून एलपीजी गॅसला पूर्ण पर्याय असून एलपीजी सिलेंडर प्रमाणेच ते सिलेंडर अथवा पाईप द्वारे व्यवसायिक व घरगुती ठिकाणी वापरता येऊ शकते. दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत घडविण्याच्या दिशेने एम सी एल कंपनीचे हे पहिले पाऊल आहे. सदरील हा प्रकल्प एमसीएल इंडिया कंपनीच्या मार्गदर्शनाखाली येत्या वर्षभरात पूर्ण होणार असून शेतीतील टाकाऊ कचरा गवत तसेच घरगुती कचरा पासून जैविक इंधन व सेंद्रिय खताची निर्मिती दररोज केली जाणार आहे स्वच्छ व पर्यावरण पूरक इंधन निर्मितीमुळे वातावरणातील प्रदूषण कमी होण्यास मोलाची मदत होणार आहे तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून स्वयंपाक, औद्योगिक क्षेत्रासाठी लागणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या इंधनाची निर्मिती केली जाईल. औसा तालुक्यातील 132 गावी सहीत इतर गावातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने क्रांती आणण्याचे काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आता पूर्ण होणार असल्याचे सांगितले. जागतिक महामारी पोरणा च्या साथीने देशाची आर्थिक व्यवस्था अतिशय संकटातून जात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाचे भाव गगनाला भिडले आहेत त्यामुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडल्याने अनेकांची रोजगार गेले आहेत दरडोई उत्पन्न घेतले आहे तसेच जागतिक तापमान वाढ चिंतेचा विषय ठरत आहे त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळला आहे त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे यावरील समस्यांचा विचार करून एम सी एल कंपनी हा प्रकल्प राबविला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या