जेष्ठ नागरिक लक्ष्मण ढोणे यांचे हृदयाविकाराच्या झटक्याने निधन
प्रतिनिधी लातुर - लक्ष्मण कांबळे
उमरगा तालुक्यातील कुन्हाळी येथील रहिवासी लक्ष्मण भिवाजी ढोणे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी १२.३० वाजता च्या सुमारास हृदयविकाराचा झटक्याने त्यांच्या राहत्या घरी कुन्हाळी येथे निधन झाले त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सायंकाळी बौद्ध स्माशंनभूमीत बौद्ध पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी परिसरातील अनेक मान्यवर मंडळी व नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले तीन मुली नातू नातवंडे असा परिवार आहे लक्ष्मण ढोणे मुंबई हायकोर्टातील नामवंत वकील माधवराव ढोणे यांचे ते वडील होते तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य कोष्याधक्ष तथा सत्य पोलीस टाईम्सचे उपसंपादक लक्ष्मण कांबळे यांचे काका होते.
परिसरात लक्ष्मण ढोणे हे सर्वांच्या परिचयाचे होते यांच्या या अचानक जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती. तर सध्या लॉक डाऊन असल्याने अनेकांना अंत्यसंस्कारासाठी जाता आले नाही म्हणून खंत व्यक्त करत होते .
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.