मुस्लिम आरक्षण व समाजाच्या शैक्षणिक,आरोग्य,रोजी-रोटीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार---* *माजी खासदार हुसेन दलवाई*

 

*मुस्लिम आरक्षण व समाजाच्या शैक्षणिक,आरोग्य,रोजी-रोटीच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार---*




  *माजी खासदार हुसेन दलवाई*

मुंबई दि. 30/5/2021-मराठा आरक्षणाबरोबरच मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे तसेच कोविड महामारीच्या धर्तीवर समाजामध्ये  निर्माण झालेले शिक्षण,आरोग्य व रोजी-रोटीच्या प्रश्नावर मा. मुख्यमंत्र्याची लवकरच भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती मौलाना आझाद विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री, हुसेन दलवाई यांनी मंचच्या राज्यव्यापी वेबीनारमध्ये दिली.

             वेब बैठकीच्या सुरुवातीला खासदार राजीव सातव,आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुस्लिम विचारवंत मौलाना वहिदुद्दीन खान,जमियत उलमा-ए- हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष हजरत मौलाना कारी सय्यद मोहम्मद मन्सूरपुरी, राष्ट्रवादीचे नेते अ. गफ्फार मलिक,मुस्लिम एबीसी आँर्गनायझेशनचे प्रदेश अध्यक्ष हाजी शब्बीर अत्तार, संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार,ज्येष्ठ समीक्षक,साहित्यिक डॉ.अकरम पठान, गझलकार ईलाही जमादार, कासिदकार हाजी अ.लतीफ नल्लामंदु,हाजी अल्लाबक्ष हुंडेकरी आदींच्या दुःखद निधन बद्दल शोक प्रकट करून आदरांजली व दुआ व्यक्त करण्यात आली.

         मंचचे सरचिटणीस हसीब नदाफ यांनी प्रस्तावनेत मुस्लिम समाजाच्या आरक्षण,ओबीसीची पदोन्नती,नुकताचआलेला सुप्रीम कोर्टाचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षण विरोधातला निर्णय याबाबत भूमिका मांडली. त्यानंतर मंचचे उपाध्यक्षा मा.ऐनुल अत्तार यांनी मुस्लिमांच्या शैक्षणिक समस्येचा आढावा सादर केला. मुस्लिम समाजातील शैक्षणिक गळती संपविण्यासाठी गाव पाताळीवला प्रयत्न करावे, बार्टी- सारथी या संस्थाप्रमाणे अल्पसंख्याक समाजासाठी फातिमा शेख एज्युकेशन फाउंडेशनची शासनाने निर्मिती करावी,मौलाना आजाद महामंडळासाठी पर्याप्त निधी द्यावा, नागपूर येथील हज  हाऊस येथे यूपीएससी, एमपीएससी व कौशल्य विषयक मार्गदर्शन केंद्र सुरू करावे अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या.शिक्षणतज्ञ अ.करीम सालार यांनी शिक्षण क्षेत्रात मुस्लिमांना आरक्षण लागू करावे  यासाठी मंचने कोर्टात रिट दाखल करावे व मुस्लीम शैक्षणिक संस्थांना अनुदान सहित त्वरित परवानगी द्यावी अशी मागणी केली. मुस्लिम आरक्षणावर फक्त निवेदने न देता राज्यव्यापी कृतीशील आंदोलनाची आखणी करावी अशी मागणी प्रदेश सरचिटणीस युसुफ अन्सारी यांनी केली.

         डाँ.दानिश लांबे यांनी नवीन शैक्षणिक धोरण व न्यू ग्लोबल ऑर्डिनेंस याविषयी कृतिशील काम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.आर.टी.ई व शैक्षणिक मार्गदर्शनासाठी जिल्हा पातळीवर शिबिरे आयोजित करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. कोविड महामारीमुळे समाज आर्थिक समस्यांना तोंड देत आहे,वैद्यकीय सेवामधील भ्रष्टाचार व असुविधेमुळे सामान्य लोक त्रस्त असून त्यासाठी आरोग्य, रोजगाराच्या प्रश्‍नावर काम करण्याची आवश्यकता दाऊद दलवाई व खलील सय्यद यांनी व्यक्त केली.विचार मंचतर्फे सर्व प्रश्नावर काम करण्यासाठी टास्क फोर्स निर्माण करावे असे मत उपाध्यक्ष  रुफी भुरे यांनी व्यक्त केले शासकीय योजना व प्रशिक्षण योजनांची  अल्पसंख्यांकांना माहिती होण्यासाठी प्रयत्न करावेत असे  सदफ शेख यांनी सुचवले. राज्य व तालुका पातळीवर मंचची सभासद नोंदणी करून मंचचे काम वाढवण्याची गरज ईस्माईल पटेल यांनी व्यक्त केली.कोविड महामारी मध्ये कुटुंबातील कर्त्या व्यक्ती दगावल्या आहेत अशा कुटुंबांना शासनाने भरपूर मदत करावी व शासनाच्या महात्मा फुले आरोग्य योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न करणाऱ्या रूग्णालयावर कारवाई करावी अशी मागणी भैय्या महाजन यांनी व्यक्त केली. जकात व इतर देणगीच्या माध्यमातून निधी जमा करून तो मुस्लिम समाजाच्या शिक्षणावर खर्च करावा व त्यासाठी राज्यव्यापी संस्था स्थापन करावी अशी मागणी प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक यांनी केली.वेगवेळ्या प्रश्नावर महिन्यातून किमान दोन राज्यव्यापी बैठका आयोजित करण्याचे यावेळी सर्वानुमते ठरविण्यात आले. शेवटी मंचचे सरचिटणीस युसुफ अन्सारी यांनी आभार व्यक्त केले.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या