*बोळेगाव येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी*
देवणी प्रतिनिधी:- शिक्षण, स्वावलंबन, संघटन, स्वाभिमान आणि प्रसंगी संघर्ष करायला मागे पुढे पाहू नका आसा पंचसूत्री संदेश देणाऱ्या हिंदुस्तानच्या इतिहासातील सर्वात मोठ्या राज्याची धुरा सलग 29 वर्ष समर्थपणे सांभाळणारी पहिली स्त्री राज्यकर्ती,पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी यावेळी प्रतिमेचे पूजन सरपंच सौ.रंजणाताई भरत म्हेत्रे व चौकातील पाठीचे पूजन बाबुराव तेलागावे यांच्या हस्ते करण्यात आले व बोळेगाव ग्रामस्थांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी धनराज पाटील, योगीराज चांडेस्वरे,संजीव म्हेत्रे,मनोज जडगे, दिगंबर जडगे ,छत्रघुन कोकरे, माधव जडगे, बालेसाब शेख, मोहन तांबवाड, संकेत सूर्यवंशी, शिवा जकाकुरे, राजीव पाटील, देविदास म्हेत्रे, रामेश्वर भातांब्रे, गणेश भाईमले, परमेश्वर पाटील व गावातील आदी नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय समाज पक्षाचे युवा देवणी तालुका अध्यक्ष वैभव म्हेत्रे यांनी केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.