संस्थाचालक आणि मुख्याध्यापकाने अडविला सेवा निवृती वेतनाचा प्रस्ताव
जळकोट :दि. १८ मे
जळकोट येथील इन्दिरा गांधी प्राथमिक शाळेचे संस्था चालक आणि मुख्याध्यापक यांनी शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक रामराव नामवाड यांच्या निवृती वेतनाचा प्रस्ताव मागील दहा वर्षांपासून जाणीवपुर्वक अडवून ठेवलयाने निवृती वेतनाअभावी या सेवानिवृत्त शिक्षकाच्या कुटुंबावर ऊपासमारीची वेळ आली असून या कुटुंबाचे हाल होत आहेत
जळकोट येथील इंदिरा गांधी प्रा. शाळेतील शिक्षक पुंडलिक रामराव नामवाड (६७)हे वयोमानानुसार ३० नोव्नोव्हे २०११ रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.
शाळेतील एखादा शिक्षक सेवानिवृत्त झाल्यानंतर या सेवानिवृत्त शिक्षक ऊदर निवाहाकरिता शाळेचे मुख्याध्यापकांने तातडीने सेवा निवृरतिवेतनाचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावा लागतो. परंतु इदिरा गांधी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकांने व सेवानिवृत्त शिक्षक पुंडलिक रामराव नामवाड ( रा.हालदवाढवणा) यांच्या निवृती वेतनाचा प्रस्ताव ३० नोव्हेंबर २०११पासून आजतागायत तयार केला नाही.
सदरील शिक्षकाच्या कुटुंबात इतर चार सदसय असून निवृत्ती वेतनअभावी या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून या कुटुंबाचे अतिशय हाल होत आहेत. निवृत्ती वेतनाचा प्रस्ताव तयार करावा म्हणून सदरील शिक्षकाने मुख्याध्यापकाकडे असंख्य वेळा याचना केली असताना मुख्याध्यापकांने
संस्थाचालकांना भेटण्याचा सल्ला दिला. संस्थाचालकांकडे असंख्य वेळा याचना केली असताना त्यांनी मुख्याध्यापकाकडे जाण्याचा सल्ला दिला.अशा प्रकारे संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांनी एकमेकांकडे अंगुलीनिर्देश करीत मागील दहा वर्षांपासून जाणीवपुर्वक सेवानिवृत्त शिक्षकाची क्रूर चेष्टा चालविली आहे या संदर्भात गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी ( प्रा.)यांच्याशी अर्ज, निवेदन आणि पञव्यवहार केला परंतु आजतागायत कहीच हालचाल झालेली नाही. अर्थिक कुचंबणेमूले सेवानिवृत्त शिक्षक दिवसेंदिवस शारिरीक आणि मानसिकदृष्टय़ा खचत असून वैफल्यग्रस्त होवून त्याचे मानसिक स्वास्थ्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. संस्थाचालका आणि मुख्याध्यापक यांनी चालविलेल्या या पोरकटपणामुळे शिक्षकाच्या नशिबी आलेली घोर कुचंबणा आणि लाजिरवाणे जिणं पाहून या घटनेचा समाजातील सर्व स्तरातून तीव्र धि: कार करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.