पेट्रोल डिझेल गॅस रासायनिक खतांची दरवाढ कमी करा.... औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

 पेट्रोल डिझेल गॅस रासायनिक खतांची दरवाढ कमी करा.... औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी










औसा मुख्तार मणियार

संपूर्ण महाराष्ट्रासह राज्यात कोरोना चा संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून सर्व देशवासी यामुळे आर्थिक दृष्ट्या भरडून निघाले आहेत. अशातच केंद्र सरकार द्वारे वेळोवेळी पेट्रोल, डिझेल व गॅस रासायनिक खतांच्या भरमसाठ प्रमाणात वाढलेल्या किमती कमी करावे अशी मागणी औसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली असून त्या आशयाचे निवेदन तहसीलदार औसा यांच्यामार्फत माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पाठवण्यात आले आहे. मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य रोगाने थैमान घातले असून सर्व देशवासी यामुळे अधिक दृष्ट्या भरून निघाले आहेत. अशातच केंद्र सरकार द्वारे वेळोवेळी पेट्रोल, डिझेल व गॅसची झालेली दरवाढ तसेच रासायनिक खतावरील झालेली दरवाढ ही देशवासीयांसाठी व शेतकरी यांच्यासाठी मोठी अन्यायकारक आहे. सध्या शेतकऱ्यांचे, व्यापाऱ्यांचे व सर्वसामान्य लोकांचे अर्थचक्र पूर्णपणे बंद झालेले असून नागरिक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत, त्यांच्यासमोर उपजीविकेसाठी मोठे संकट निर्माण झाले आहे. अशातच पेट्रोल, डिझेल व गॅस यांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच येणाऱ्या खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकरी यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे टाकले आहेत,तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपणास विनंती करण्यात येते की पेट्रोल, डिझेल, गॅस व रासायनिक खतांची दर वाढ कमी करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.यानिवेदनावर तालुकाध्यक्ष सुभाष पांडुरंग पवार,ता कार्याध्यक्ष नरेंद्र पाटील,स.घा.यो. अध्यक्ष बबन भोसले, योगीराज पाटील,श्याम पाटील, रुबाब कल्याणी,सचीन माळी,अशोक गरड,बाळू जाधव,नजीब पटेल,अमोल माने यांच्या स्वाक्ष-या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या