अन्न प्रक्रिया उद्योगासाठी वैयक्तीक लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी

 

अन्न प्रक्रिया उद्योगासाठी वैयक्तीक

लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी





 

लातूर, दि.28(जिमाका):-जिल्हयातील वैयक्तीक लाभार्थ्यांनी अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन पध्दतीने जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

केंद्र पुरस्कृत आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत PMFME प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्‍नयन ही योजना असंघटीत क्षेत्रातील अन्न प्रक्रिया उद्योगासाठी राबविली जाणार आहे. या योजने अंतर्गत केंद्र शासनाने लातूर जिल्हयासाठी एक जिल्हा एक उत्पादन (ODOP)  या बाबीखाली टोमॅटो या पिकास मंजूरी दिलेली आहे. ही योजना सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षात राबविली  जाणार आहे.

सदर योजना सन 2021-22 अंतर्गत लातूर जिल्हयातील वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजने अंतर्गत वैयक्तीक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना एकूण प्रकल्प किमतीच्या 35 टक्के व कमाल रु. 10 लाख या मर्यादेत अनुदान देय  राहील. लाभार्थी हिस्सा हा प्रकल्प किमतीच्या किमान 10 टक्के असेल व उर्वरीत बँकेचे  कर्ज असणे बंधनकारक आहे.

या योजने अंतर्गत अर्थसहाय्यासाठी सध्या कार्यरत असलेल्या वैयक्तीक सुक्ष्म उद्योगांना भांडवली गुंतवणुकीसाठी सहाय्य करण्याकरीता  ODOP या धोरणानुसार टोमॅटो प्रक्रिया संबंधीत उत्पादन घेत असलेल्या उद्योगांना प्राधान्य देण्यात येईल. तथापि कार्यरत उद्योग जर अन्य उत्पादन घेत असतील  तर त्यांना देखील या योजने अंतर्गत सहाय्य केले जाईल. मात्र नविन उद्योजकांच्या बाबतीत जे उद्योग टोमॅटो प्रक्रिया वर अधारीत आहेत त्यासाठीच  अर्थसहाय्य करण्यात येईल.

वैयक्तीक  सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योजकांना योजने अंतर्गत सहभागी होण्याकरीता ऑनलाईन पोर्टल सुरु झाले आहे. या करीता अर्जदारांची नोंदणी  व अर्ज भरण्याकरीता https://pmfme.mofpi.gov.in/ या वेबसाईटचा वापर करावा.अधिक माहितीसाठी जिल्हा अधिक्षक कृ‍षि अधिकारी, लातूर कार्यालयातील तंत्र सहाय्यक एम.एम. निटूरे मो.नं.9422750401 यांच्याशी सपंर्क करावा./ www.krishi.maharashtra.gov.in  या संकेत स्थळाला भेट दयावी.

 

                                           


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या