म्युकरमायकोसिस च्या रुग्णांना महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून तीन रुग्णालयात मोफत उपचार
लातूर, दि.28(जिमाका):-महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना मुक्त रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस आजाराचे प्रमाण वाढले आहे. म्युकरमायकोसिस आजारावरील उपचाराकरिता शस्त्रक्रिया/ उपचार याची गरज पडते. या आजारावरील उपचारासाठी येणारा खर्च जास्त असल्याने रुग्णांवर आर्थिक भूर्दंड येऊ नये याकरिता . राज्य सरकारने याची दखल घेत रुग्णांना दिलासा देण्यासाठी या आजारावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचाराची परवानगी दिली आहे.
शासनाच्या निर्देशानुसार जिल्हयातील ३ रुग्णालयात महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून म्युकरमायकोसिस आजारावर मोफत उपचार दिले जातील, सदर ३ रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांना उपचाराकरिता आवश्यक असणारे अम्फोटेरीसीन बी इंजेक्शन मोफत देण्यात येईल.
लातूर जिल्ह्यात तीन रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस आजारावर महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.ती रुग्णालये पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये विलासराव देशमुख वैद्यकीय विज्ञान संस्था,लातूर, यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय,लातूर व विवेकानंद हॉस्पिटल, लातूर या तीन रुग्णांयाचा समावेश आहे.
जिल्यातील जास्तीत जास्त म्युकरमायकोसिस रुग्णांनी वरील ३ रुग्णालयामध्ये जाऊन महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घ्यावा व रुग्णालयात जाताना सोबत रुग्णाची वैद्यकीय फाईल, रेशन कार्ड ,आधारकार्ड (किवा शासनमान्य ओळखपत्र ) सोबत घेऊन जावे. पात्र लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.