“ऑक्सीजन आपल्या दारी” या उपक्रमामुळे रूग्णांच्या खर्चात लाखोची बचत...!
भाजयुमोचा अभिनव उपक्रम.. रूग्ण व नातेवाईकाना मिळतोय आधार..
लातूर दि.03/06/2021
कारोणा रूग्णांची संख्या शासकीय दप्तरी कमी वाटत असली तरी कोरोणामुळे मृत्यु पावणार्या रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे समोर आलेले आहे. कोरोना रूग्णावर उपचार करण्यासाठी शासकीय यंत्रणा कमी पडत आहे हे वास्तव आहे. ही बाब लक्षात घेवून भाजयुमोचे शहर जिल्हाअध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोवीड -19 हेल्पलाईन, वृक्षारोपन, अटल अन्नसेवा असे उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत. या उपक्रमाचा एक भाग म्हणून "ऑक्सीजन आपल्या दारी" या उपक्रमाअंतर्गत ज्या रूग्णांची ऑक्सीजन लेवल 95 च्या खाली आहे अशांना घरपोच ऑक्सीजन सेवा दिली जात आहे. या विधायक उपक्रमामुळे आनेक रूग्ण बरे झाले असुन यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील रूग्ण व नातेवाईकाना मोठा आधार मिळत आहे. या उपक्रमाचा आदर्श इतर लोकप्रतिनिधीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
सध्या बरेच कोरोणारूग्ण उपचारासाठी 10 ते 15 दिवस हॉस्पीटलमध्येच रहात आहेत. परिणामी त्यांना लाखोचा खर्च सहन करावा लागत आहे. त्यांचा कोरोणा रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतरही बर्याच रूग्णांची ऑक्सीजन लेवल 95 च्या खाली येते त्यामुळे त्यांना ऑक्सीजन लेवल येण्यासाठी परत 10 ते 15 दिवस दवाखान्यातच रहावे लागते. त्यामुळे जास्तीचा आर्थीक भूर्दड त्या त्या रूग्ण व नातेवाईकाना सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेउन भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी भाजपायुमोच्या माध्यमातुन घरपोच ऑक्सीजनची सेवा डॉक्टरांच्या सल्यानुसार मोफत सुरू केली आहे. साधारणपणे ऑक्सीजन लेवल आणण्यासाठी मोठा खर्च येत असला तरी भाजपायुमोच्या ऑक्सीजन घरपोच सेवेमुळे रूग्ण व नातेवाईकांच्या खर्चात मोठी बचत होत आहे. या कामी भाजपायुमोचे सरचिटणीस अॅड.गणेश गोजमगुडे, सागर घोडके, उपाध्यक्ष गजेंद्र बोकण,अमेाल गीते, संतोष तिवारी, आकाश बजाज, दुर्गेश चव्हाण, चंद्रशेखर पाटील, गणेश पवार, यशवंत कदम, नवनाथ ढेकरे, गोविंद सुर्यवंशी, धनुभाउ आवसकर, आकाश बजाज, अॅड.पंकज देशपांडे, महादेव पिटले,चंद्रशेखर पाटील, उमेश इरपे, राहूल बिराजदार यांच्यासह भाजपायुमोचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत. युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य कुटूंबीयाना मोठा आधार मिळालेला आहे. त्यांचा हा विधायक कामाचा आदर्श इतरासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.
रूग्णासाठी हवाय मदतीचा हात..
कोरोणा रूग्णांची संख्या अजूनही म्हणावी तसी कमी झालेली नाही. त्यामुळे कोरोणाग्रस्त प्रत्येक रूग्णाला ऑक्सीजनसाठी पाठपुरावा करावा लागत आहे. ही रूग्णांची गरज लक्षात घेउन भाजपायुमोतर्फे ऑक्सीजन मशीनचे लोकार्पण केले असुन या मशीनच्या माध्यमातून कोरोणाग्रस्त रूग्णांना घरपोच ऑक्सीजनची सेवा मीळत आहे या मशिनवर रूग्णांची 100 टक्के मागणी पूर्ण करता येत नाही. तरी आहे त्या मशिनद्वारे ऑक्सीजनची सेवा घरपोच दिली जात आहे. त्यामुळे लोकप्रतिनीधी व कार्यकर्त्यानी नविन ऑक्सीजन मशिनसाठी मदत करावी असे अवाहन भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले आहे. या बाबतच्या अधिक माहितीसाठी आकाश बजाज यांच्या 9028841353 व पंकज देशपांडे यांच्या 9422275181 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.