*बियाणे आणि खताचा साठा करून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या व्यापार्यांचे दुकान परवाने रद्द करण्याची कायदेशीर कार्यवाही कृषी अधिकाऱ्यांनी करावी.*
- *लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे*
लातुर : दि. ३ - खरिपाची पेरणी तोंडावर आलेली असताना अनेक व्यापारी बियाणांचा आणि खतांचा साठा करून शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. प्रत्यक्ष दुकानात खत बियाणे असतानासुद्धा दुकानदार दुकानाच्या बाहेर बियाणे शिल्लक नाहीत असा बोर्ड लावत आहेत. असे कसे काय एकदम बियाणे गायब होते ? बियाणे कसे काय शिल्लक नाही ? व्यापारी शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेत आहेत. बियाणे विक्रेत्या व्यापार्यांना आणि बियाणे निर्माण करणार्या कंपन्यांना सूचना वजा इशारा दिला आहे की, आपण जर काळा धंदा करून शेतकऱ्यांची लूट करणार असाल तर तुमचे काळे धंदे कसे बंद करायचे हे आम्हाला चांगले माहीत आहे. असा इशारा लोकाधिकार संघाचे लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी दिला आहे.
सामान्य शेतकऱ्यांची लूट करायच्या भानगडीत व्यापाऱ्यांनी पडू नये. तसेच कृषी अधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांचे गोडावून तपासावेत. गोडाउन मध्ये बियाण्यांचा आणि खताचा मुबलक साठा असून व्यापारी साठेबाजी करत आहे. तेव्हा कृषी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात कडक कार्यवाही करावी. आणि साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करावेत. शेतकऱ्यांना वेळेवर आणि व्यवस्थित खत बियाणे मिळेल याची व्यवस्था कृषी अधिकाऱ्यांनी करावी. अशी मागणी लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी. संबंधित कृषी विभागाकडे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.