कटघर गल्लीसह औसा शहरातील वराहांचा बंदोबस्त करण्याची मागणी..
एस ए काझी
औसा प्रतिनिधी : - औसा शहरातील जुन्या वस्तीमध्ये आणि विशेषतः गल्ली परिसरात मोकाट वराहांचा सुळसुळाट झाला आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या - येणाऱ्या वाहनास व पायी चालणाऱ्या नागरिकास मोकाट वराहांच्या सुळसुळाटमुळे त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांना चावा घेण्याचेही प्रकार घडत आहेत. कटगर गल्ली परिसरातील लहान घरात वराह घुसून त्रास देत आहे. शहरातील गल्लीबोळात सर्वच सर्वत्र वऱाहांचा संचार वाढला आहे. त्यामुळे शहर परिसरात घाण होत असून घाणीमुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाइन फ्ल्यू या सारखे साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. जागोजागी साचलेल्या घाणीमुळे संपूर्ण शहरात डासांचे प्रमाण वाढले आहे. नगर परिषदेस वेळोवेळी सूचना देऊनही वराह मुक्तीचा संकल्प करणारी औसा नगर परिषद वराहाचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. अधून-मधून कैकाडी समाजाच्या अध्यक्षाशा सोबत बैठक झाल्याचे व कधीतरी थोडे वराह पकडण्याचे भासवून शहरातील नागरिकांची दिशाभूल केली जात असून नगर परिषदेचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व आरोग्य स्वच्छता सभापती यांनी वेळीच लक्ष घालून वराहाचा बंदोबस्त करावा. तात्पुरती कारवाई न करता 100% वराह मुक्तीचा केलेला संकल्प पूर्ण करावा अशी मागणी मुख्याधिकारी औसा नगरपरिषद यांना निवेदनाद्वारे केली असून या निवेदनावर शेख इस्माईल इमामसाब, खुर्शीद शेख, इरशाद शेख,आबीद शेख, अखिल शेख, अमजद शेख, हाशमोद्दीन शेख, अस्लम शेख, उमर शेख, नदीम शेख, हनुमंत जाधव, बाबुराव औटी इस्माईल शेख यांच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.