मोहसीन शेखच्या परिवाराला न्याय द्या :एम आई एम

 मोहसीन शेखच्या परिवाराला न्याय द्या- अॅड. शफीक भाऊ



बीड, (प्रतिनिधी) - सात वर्षांपूर्वी पुणे येथील सॉफ्टवेअर इंजिनियर मोहसीन शेख या तरुणाला मॉब लिंचींग मध्ये ठार मारण्यात आले होते. एवढा मोठा कालावधी उलटूनही आजपर्यंत त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नसल्याने एआयएमआयएम पक्षाने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत पाठविलेल्या निवेदनातून न्याय देण्याची मागणी केली आहे.

या विषयी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट २ जुन २०१४ रोजी काही समाजकंटकांनी केल्या होत्या.त्यानंतर त्या पोस्टचा आधार घेत हिंदुराष्ट्रसेनेच्या कार्यकत्यांनी मिळून निष्पाप व निरपराध असलेल्या तसेच त्या पोस्टशी काहीही संबंध नसलेल्या सॉफ्टवेअर इंजीनिअर मोहसीन शेखची हत्या केली होती. आज सात वर्ष झाले त्या गंभीर घटनेला मात्र अजून पर्यंत पीडिताच्या परिवाराला न्याय भेटलेला नाही. घटना चडल्यानंतर खटला दाखल झाला मात्र न्याय अजून मिळाला नाही. मुख्य आरोपीला जामीन मंजूर होतोय. अश्या पद्धतीने एकंदरीत ह्या खटल्याबद्दल सगळी दिरंगाई, अनास्था पाहायला भेटत आहे. गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. एका निरपराध तरुणाची धर्माच्या आधारावर हत्या करणे म्हणजे एक प्रकारे भारतीय संविधानाच्या मुळावर हल्ला करणेच आहे. घटना घडल्या नंतर तत्कालीन शासनाने पीडिताच्या भावाला सरकारी नोकरी आणि पीडिताच्या परिवाराला आर्थिक साहाय्य देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनाची पूर्तता करण्यात आलेली नाही. दुदैवाने सांगावेसे वाटत आहे की, त्याच्या प्र पीडिताच्या वडिलांचे निधन झाले. या प्रकरणामध्ये अत्यंत घृणास्पद गोष्ट अशी आहे की, एका निष्पाप आणि निरपराध तरुणाची हत्या केली जाते त्यानंतर त्यातील मुख्य आरोपी देवकरण त्याच्या मिरवणुका काढल्या जातात. मोठ-मोठे सत्कार केले जातात. एका निष्पाजीव घेतलेल्या गुन्हेगारांचा गौरव करणे हे भारतीय संस्कृतीला मारक आणि अशोभनीय आहे. अशा कृत्यांनी सामाजिक एकता उस्त केली जात आहे. गुन्हेगाराचा सन्मान करणे म्हणजे त्याला पुन्हा प्रोत्साहित करण्यासारखे आहे.


मुळात मोहसीन शेख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या धनंजय देसाई वर तब्बल वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणी मागणे, धमक्या देने जातीय तेढ निर्माण करणे धर्माच्या आधारावर हिंसा करून सामाजिक एकता उस्त करणे, सामाजिक भावना दुखावणे वक्तव्य करणे इत्यादी स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. धनंजय देसाई आणि त्याच्या कार्यकर्त्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आणि गुंड प्रवृत्तीची आहे. त्यांची विचारधारा संविधानाच्या मूल्यायर घाव घालणारी आहे. त्यांचे कार्य सामाजिक सलोखा बिघडवणारे आहेत. तरीसुद्धा हे लोक गुन्हे करूनही बाहेर मोकाट फिरत आहेत. ही गोष्ट सर्वांसाठी घातक आहे. कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे ही शासनाची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे. शासनाने प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी काम करणे


गरजेचे आहे. हिंसक प्रवृत्तीच्या सगळ्या शक्तीविरुद्ध U-P-च्या अंतर्गत कारवाई करून कडक पाऊल उचलणे आवश्यक आहे. आज सात वर्ष होत आले तरी मोहसीनच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत. जर मोहसीनच्या मारेकल्यांना वेळीच शिक्षा झाली असती व


फुटुंबियांना वेळीच न्याय मिळाला असता तर आज देशामध्ये घडलेल्या इतर मॉब लिचिंग च्या घटना घडल्या नसत्या राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबियांना दिलेले आश्वासन अजून पर्यंत पूर्ण केलेले नाही. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता राज्य सरकारने करून मोहसीन च्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा आणि पुढील मागण्यांना मंजूर कराव्यात पीडित मोहसीन शेखच्या भावाला तात्काळ शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे. पीडित या परिवाराला उर्वरित आर्थिक सहत्य लवकरात लवकर देण्यात यावे. त्वरीत विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात यावी. घटनेतील मुख्य आरोपी धनंजय देसाईला जमिन मंजूर करताना न्यायालयाने काही अटीतल्या होत्या. मात्र धनंजय देसाई ने तुरुंगाबाहेर येताच सर्व अटी पायदळी तुडवत न्यायालयाचा अवमान केला गेला आहे. म्हणून धनंजय देसाईचा जामीन रद्द करण्याची अपीत्त न्यायालयात करण्यात यावी. आरोपींविरुद्ध U-P- अंतर्गत कारवाई करण्यात यावी. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता कारवाईला उशीर झाला आहे, त्यामुळे खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवला जाया खटल्याची सुनावणी डे-टू-डे घेण्यात यावी. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्यात लवकरात लवकर मॉब लिचींग विरोधात कडक कायदा तयार करावा याच हलगर्जीपणा करून दिरंगाई केल्यास पौडितच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी संवैधानिक मार्गाने आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून ए आय एम आय म पक्षाचे जिल्हाध्यक्ष शेख शफीक भाऊ यांनी दिला असून निवेदनावर त्यांच्यासह एजाज खन्ना भाई, नगरसेव तीन नगरसेवकाफी अशफाक, मुफ्ती बाजेद साहब, नईम मेंबर, सोफियान मनिबार इलयास ईनामदार, नसीर भाई, रियाज खान आदींची नावे आहे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या