शब्दांना खेळवत ठेवणारा लेखक तथा कवी---- इक्बाल शेख

 शब्दांना खेळवत ठेवणारा लेखक तथा कवी---- इक्बाल शेख

-----------------------------------------------------

व्यक्ती विशेष -----म.मुस्लिम कबीर

-----------------------------------------------













साधारणतः 17,18 वर्षा पूर्वी ची गोष्ट, मी प्रसिद्ध हिंदी साप्ताहिक "एलान" लातूर च्या आझम गंज गोलाईच्या कार्यालयात बसलो होतो,पत्रकार मझहर पटेल सोबत  जेम तेम  18-20 वर्षाचा एक सड पातळ बांधाचा, उभी नाक एकदम टापटीप राहणीमान व सुंदर युवक सलाम करून समोरील खुर्चीवर बसला, मझहर पटेल हे औसा तालुका प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते,त्यांनी बातम्या दिल्या नंतर त्या युवकाची ओळख करून दिली.आणि हा युवक म्हणजे इक्बाल शेख, इतका जवळचा निघाला की त्यांच्या दोन पिढी बरोबर आमचे कौटुंबिक मित्रत्वाचे नातेच मी नावानिशी सांगितले. यावर तो ही अवाक झाला पण जनरेशन गॅप म्हणतात ना, त्या मुळे इक्बालचा माझा संबंध आला नव्हता. त्यांचे आजोबा सय्यद इब्राहिम साहेब सर्गुरू,हे औसा व परिसरातील प्रतिष्ठित धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध होते,तर वडील हाजी शेख आर.एम सर हे जिल्हा परिषद हायस्कूल चे आदर्श मुख्याध्यापक (वर्ग2) व ज्येष्ट बंधू डॉ.आर.आर शेख हे आरोग्याधिकारी म्हणून कार्यरत. अश्या या प्रस्थ व शिक्षित कुटुंबात इक्बाल चा जन्म..

    इक्बाल शेख हे उच्च विद्यभूषित,कॉम्प्युटर सायन्स चे पदवीधर नंतर त्यांनी एलएलबी ची पदवी प्राप्त केली व एका नामांकित फायनान्स कंपनी मध्ये सल्लागार मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.आर्थिक संस्थेत काम करीत असतानाही त्यांच्यातला शाब्दिक खेळाडूपण कांहीं गेला नाही.सेवारत असताना देखील ते आपला लीहण्याचा छंद जोपासत आहेत एवढेच नव्हे तर त्यांनी आपल्यातल्या कवित्वा ची जाण "सावली" चे प्रकाशन  विठ्ठल रुक्मनी देवस्थान समिती पंढरपूर चे सह अध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या शुभ हस्ते करून दिली.ते अनेक वर्षापासून प्रासंगिक व शीघ्र कविता , लेख लिहून आपली छाप कायम ठेवली आहे. खरे तर ते मराठी व हिंदी भाषेतील शब्दांना नेहमी खेळवत ठेवले आहे.

   पत्रकारिता हा त्यांचा छंद असल्यामुळे ते केवळ " लकीर के फकीर" म्हणून  लीहते राहिले नाही तर पत्रकारितले बारकावे, खाच खळगे काय असतात ते पाहण्यासाठी पत्रकारितेतील पद्वीच प्राप्त केली.त्यांचे लेख, कविता हे सा.एलान लातूर , दैनिक लोकमत, दैनिक एकमत, दैनिक मनोगत मध्ये प्रकाशित होतात. आज ते " लातूर रिपोर्टर" चे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत.व  प्रासंगिक विचार "आँखो देखा हाल" या सदरातून परखडपणे मांडतात.या सदरातून त्यांनी समाजातील अव्यवहार्य चाली रिती चे चित्रण आपल्या लेखनतून मांडून समाज मन बदलण्या चे कार्य करीत आहेत. समाजातील विविध घटकांच्य

 वेदना ही मांडून त्यांना कश्या प्रकारे मदत,साह्य करता येईल याची जाणिव करुन देत.याचाच प्रत्यय म्हणून समविचारी मित्र मंडळी नी मिळून एक सोशल एज्युकेशन अँड वेलफेअर ही संस्था स्थापन करून समाजातील गोर गरीब, विधवा, अनाथ व गरजवंताना हर प्रकारे मदत करीत आहेत. 

       एड.इक्बाल शेख हे आपल्या लेखणीतून जितके कठोर शब्द वापरतात तेवढेच किंबहुना त्या पेक्षा जास्त ते हळव्या मनाचे आहेत.आईचे नाव त्यांच्या समोर आले की त्यांचे डोळे पाणावले दिसतात. वास्तविक हेच आहे की " स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी".वडील हाजी रसूल साब शेख गुरुजी (सेवा निवृत्त मुख्याध्यापक) यांच्या सेवेत नेहमी तत्पर.सबंध भाऊ बहिणींचा लाडका हा इक्बाल.ज्येष्ट बंधू डॉ. आर.आर शेख(तालुका आरोग्य अधिकारी औसा) राहत जनरल स्टोअर्स चे आसिफ शेख यांची मर्जी इक्बाल शेख वर, या तिन्ही भाऊंचे एकमेकावर आतोनात प्रेम मी नेहमी अनुभवले आहे.

    एड.इक्बाल शेख यांच्या मित्र परिवारात सर्वधर्म व संस्कृती व समाजातील लोक आहेत.अनेक ज्येष्ट राजकीय नेते,यांचा रास्त संबंधात असताना देखील ते कधी आपली अडचण त्यांना सांगून सोडवून घेत नाहीत.पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक लोकांशी संवाद साधला जातो याचा लाभ अनेक लोक घेताना आपण पाहतो पण एड.इक्बाल शेख यांना मात्र ते जमले नाही.या क्षेत्रात अनेक नवीन लोक येवून आपले पाय मजबुतीने रोवत आहेत. त्यात कांहीं लीहणारे आहेत तर कांहीं फक्त पुढे पुढे करून हांजी हांजि करून पत्रकारिता  करणारे महाभाग आहेत. पण एड.इक्बाल शेख  हे लिहणारे असून देखील कोणा समोर ताट मांडत नाही हे त्यांच्यातला फार मोठा गुण आहे. ते नेहमी म्हणतात आपली लेखणी हे समाजातील किंवा प्रशासनातील अवगुण नाहीसे करण्यात सफल झाली की तोच आपल्या साठी मोठा पॉकेट होय.. पण  विविध सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक संघटना व संस्थांना मार्फत राज्य, जिल्हा, व तालुका स्तरीय पुरस्कार देवुन गौरव करण्यात आला आहे.

  एड.इक्बाल शेख हा सध्या सरळ स्वभावाचे व्यक्तित्व. बडेजाव नाही की अह्मपणा नाही.चार चौघात अगदी सहज मिसळणारे हे वकील साहेब.आज त्यांचा जन्म दिवस.. 

  आमच्या कुटुंबातील ही सर्वांचा लाडका, तो आला नाही की आमची आई म्हणते " इक्बाल गाँव गया है क्या? बहुत दीन हुये नहि आया.. " मग इक्बाल ला फोन लावून बोलायला लावतो.  असा हा प्रेमळ व्यक्ती...

  मी व माझे कुटुंब, एड.इक्बाल शेख साठी नेहमी दुआ करतो, अल्लाह आपणास उदंड आयुष्य देवो, सलामत ठेवो, दुनिया व आखिरत मध्ये यशस्वी होवो. आमीन......


Md.Muslim Kabir,

Latur Dist.Correspondent,

Urdu Media

9175978903/9890065959

alkabir786@gmail.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या