दारुच्या नशेत पित्याने केला पोटच्या मुलीचा खून
शेख बी जी
औसा: दि.२८ - तालुक्यातील आशिव गावातील एका दारुड्या बापाने पोटच्या दीड वर्षीय मुलीचा खुन केल्याची घटना घडली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,औसा तालुक्यातील आशिव गावातील २९ वर्षीय आरोपी संतोष गंगादास भोंडे हा व्यक्ती सतत व्यसनच्या आहारी गेलेला होता. व्यसनाची हौस भागवण्यासाठी सतत गंगादास भोंडे व पत्नीशी भांडण करत असे. यासोबतच पत्नीच्या चारित्र्यवर संशय घेत होता. यामुळे घरात सतत भांडण होत असत. नुकतेच झालेल्या भांडणात आरोपी संतोष याने दीड वर्षांच्या मुलीला घरातील पाण्याने भरलेल्या हौदात टाकून दिले. यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपीचे वडिल गंगादास भोंडे याच्या तक्रारीवरुन भादा पोलिसात गुन्हा नोंदवला आहे. आरोपी संतोष याला भादा पोलिसांनी अटक केली आहे. दारूच्या नशेमुळे अशा घडत आहेत. गावात दारूबंदी असतानाही सहज दारू उपलब्ध होत असल्याने या घटना घडत असल्याचे चर्चिले जात आहे. त्वरित प्रशासनाने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.