*जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर*
दि 29- उस्मानाबाद - जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य कार्यकारिणी निवडीसाठी काल 28 जून रोजी विभागीय उपाध्यक्ष संदीप मडके जिल्हाध्यक्ष दत्ता साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली यावेळी सर्वानुमते जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यात कोषाध्यक्षपदी प्रकाश चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष पदी रफिक तांबोळी (उमरगा) ज्ञानेश्वर गीते (भुम) जिल्हा संघटक पदी महेंद्र धुरगुडे (तुळजापूर) महिला कार्याध्यक्षपदी उषा येरकड (उस्मानाबाद) , जिल्हा सरचिटणीसपदी उद्धव सावळी (वाशी) महिला उपाध्यक्षपदी शीतल पाटील तर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी दत्तात्रय देऊळकर (उस्मानाबाद) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली बैठकीस जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेसचे गटनेते प्रकाश आष्टे, प्रकाश चव्हाण, प्रशांत कांबळे, ज्ञानेश्वर गीते, उद्धव साळवी, रफिक तांबोळी यांच्यासह पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
आपल्या परिसरातील ताजा घड़ामोड़ी साठी क्लिक करा www.laturreporter.in
लातूर रिपोर्टर वर
उस्मानाबाद तालुका रिपोर्टर *सय्यद महेबुब अली*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.