*डिझेल दरवाढीविरुद्ध मोटार मालक रस्त्यावर*
दि 29 - उस्मानाबाद - डिझेलची सातत्याने दरवाढ असल्याने मालवाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे आधीच व्यवसायात घट झाली आहे आणि त्यात ही दरवाढ अशा दोन्ही बाजूंनी कोंडी होत असल्याचा दावा करीत मोटर मालक रस्त्यावर उतरले काळ्या फिती लावून निषेध व्यक्त करीत त्यांनी प्रशासनामार्फत दर कमी करण्याचा साकडा घातला.
या संघटनेच्या दाव्यानुसार मालवाहतूक व्यवसाय मागणी व पुरवठा या तत्वावर चालतो कोरोना च्या अभावी 2019 व्यापार कमी-अधिक प्रमाणात बंद आहेत व्यवसाय 40 ते 50 टक्के घट झाली आहे डिझेल दरात 30 टक्के पर्यंत वाढ झाली आहे यामुळे व्यवसाय करणे अत्यंत अवघड झाले आहे तसेच व्यवसाय नसल्यामुळे देणे वाहतूकदाराकडे थकली आहे. परिणामी, अनेक वाहने फायनान्स कंपनीने ने ओढून नेली आहेत त्या अनुषंगाने आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोटर मालकांनी दंडावर काळ्या फिती बांधून दरवाढीचा निषेध केला यापुढे अशीच दर वाढ सुरु राहिले किंवा दारात योग्य घट न झाल्यास ऑगस्टमध्ये आपली वाहने आहे त्या ठिकाणी बेमुदत थांबविण्याचा निर्णय नाईलाजाने घ्यावा लागेल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष मैनोद्दीन पठाण, आयुब शेख, अल्ताफ सय्यद, हबीब शेख, सलीम पठाण, जमीर पठाण, दीपक जाधव, सुनील शेळके, मेहबूब शेख, वाहिद शेख, जावेद पठाण, करीम शेख आदीसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.