मारुती महाराज साखर कारखाना नोव्हेंबरला सुरू होणार
औसेकराना दिलेला शब्द मांजरा परिवाराने पाळला
मारुती महाराज साखर कारखान्याचे मील रोलर पुजन संपन्न
माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची कारखाना स्थळी घोषणा
तालुक्यात आर्थिक सुबत्ता सूरू होणार शेतकऱ्यांना मोठा दिलासा
औसा प्रतिनिधी दि.२९
मांजरा साखर परिवाराने निवडणूकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असुन जिल्ह्यांतील औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखान्याचे गाळप येत्या नोव्हेंबर महिन्यात सूरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मंगळवारी कारखाना स्थळी बोलताना दिली या दिलासादायक निर्णयामुळे औसा तालुक्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार असून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे दरम्यान या निर्णयामुळे तालुक्यात शेतकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फटाके वाजवून स्वागत केले आहे
तत्पूर्वी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे मंगळवारी बेलकुंड ता औसा येथे सकाळी ९.४५ वाजता आगमन झाले सुरवातीला कारखाना स्थळी असलेल्या श्री संत शिरोमणी मारुती महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले त्यानंतर माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते कारखान्यातील मिल रोलर चे पूजन मोजक्या लोकांच्या व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कोविड १९ चे नियम पाळून करण्यात आले यावेळी त्यांनी कारखान्याची सुरू असलेली डागडुजी, कारखान्याची गळीत हंगामाची होत आसलेली तयारी प्रशासन, भांडार, स्टोअर, प्रशासकीय कार्यालय, मशिनरी ची पाहणी केली त्यानंतर कारखाना स्थळी पत्रकारांशी संवाद साधला
यावेळी मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपत बाजुळगे, व्हॉईस चेअरमन शाम भोसले, लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन अँड श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, प्रदेश काँग्रेस मीडिया सरचिटणीस हरिराम कुलकर्णी,सचिन दाताळ, कार्यकारी संचालक चव्हान, यांच्यासह कारखान्याचे सन्माननीय सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते
पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, कारखाना सुरू झाल्यानंतर येणारे दोन-तीन गळीत हंगाम विक्रमी झाले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होऊ शकेल स्व.लोकनेते विलासराव देशमुख यांनी मारुती महाराज साखर कारखान्याला जन्म दिला आहे या परिसरात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं त्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येऊ नये म्हणून ह्या कारखान्याची निर्मिती झाली असून मधल्या काळात कारखान्यात सत्ता परिवर्तन झालं होतं तरी ही आम्ही या कारखान्याला मदत केली अन भविष्यात ही मदत करणार आहोत असे सांगत दिलीपराव देशमुख म्हणाले की शासनाची थकहमी या कारखान्याला मिळावी यासाठी मोठे प्रयत्न केले यासह जिल्हा बँकेने ही कारखान्यावरील कर्जाचे पुनर्गठन केले असून कर्जाच्या परतफेडीची मुदत देखील वाढविली असून कारखानाच्या दगडुजीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याचे सांगत हा कारखाना सुरू करून त्या माध्यमातून इतर उपपदार्थ निर्मिती करून त्याद्वारे शेतकऱ्यांना अधिक भाव व कारखाना कर्जमुक्त करण्याचा आमचा मानस असून यात हे संचालक मंडळ नक्कीच यशस्वी होईल याबद्दल मला निश्चित खात्री असून कारखान्यावर माझं वैयक्तिक लक्ष राहणार असून हे रोपटे लोकनेते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लावले असून आता हे सांभाळण्याची जबाबदारी या संचालक मंडळाची आहे कारखान्याला अर्थपुरवठा व मनुष्यबळाची कमतरता भासू देणार नाही कारखान्याच्या मशिनरी दुरुस्तीचे काम सुरू असले तरी उसाच्या नोंदीचे पण काम हाती घ्यावे लागणार असून कारखाना कार्यक्षेत्रात नेमका किती ऊस आहे याची माहिती असायला हवी म्हणजे व्यवस्थापन व्यवस्थित ठेवता येते उसउत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ह्या संस्था आपण निर्माण केल्याचे सांगत हे रोपटे वाढावे त्यामूळे विकासाची प्रक्रिया सुरू होते यामुळे तालुक्यातील शेतकरी, व्यापार शेतमजूर यांना मोठा आधार मिळणार आहे निवडणूकीत पालकमंत्री अमित देशमुख यांनी जो शब्द दिला होता आम्हाला कारखाना ताब्यात द्या आम्ही चालु करू त्या शब्दाची पूर्तता तंतोतंत पालन करण्याचा नक्की आमचा प्रयत्न मांजरा परिवाराचा असल्याचेही माजी मंत्री दिलीपराव देशमुख देशमुख यांनी सांगितले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.