निराधारांचे अनुदान वाटपासाठी, डी.सी.सी बँक प्रत्येकांच्या दारी

 

निराधारांचे अनुदान वाटपासाठी, डी.सी.सी बँक प्रत्येकांच्या दारी !



निराधारांचे अनुदान वाटपासाठी, डी.सी.सी बँक प्रत्येकांच्या दारी !     
     कळंब  प्रतिनिधी - उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेश बिराजदार,कार्यकारी संचालक विजय घोणसे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब डी.सी.सी बँकेचे व्यवस्थापक आर.बी.काळे,टि.ए.जाधव,बी.यू. टोणगे,आर.एम.घाडगे आदी कर्मचारी तालुक्यातील प्रत्येक गावात जावून डी.सी.सी बँक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत एप्रिल व मे महिन्याचे निराधार अनुदान प्रत्येकी दोन हजार रुपयांचे वाटप करत आहेत.
   दिनांक ४ जून रोजी तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील एकूण ४२ निराधार लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये प्रमाणे एकूण ८४००० रुपये अनुदान वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष सुरेश टेकाळे, विकास सोसायटीचे माजी चेअरमन सतीश टेकाळे,फेडरेशनचे माजी संचालक तथा ग्रामपंचायतीचे किंगमेकर भागवतराव धस, डी. सी.सी.चे माजी संचालक उत्तम टेकाळे आदी उपस्थित होते.
कोरोनाच्या या संकटकाळात डी.सी.सी बँकेच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून निराधार लाभार्थ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या