अल्ताफ शेख प्रतिनिधी उस्मानाबाद * बातमी
*शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! - राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, पहा महत्वाचे हवामान अपडेट*
राज्यात अनेक ठिकाणी पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत, तर काही भागात शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत
दरम्यान आज १८ जून रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी - हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार - राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे
*काय म्हणाले हवामान तज्ञ ?*
▪️ होसाळीकर यांनी सांगितले - राज्यात येत्या पाच दिवसात मुसळधार पाऊस पडेल, तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसायट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे
▪️ यानुसार कोकण, मुंबई, ठाणे - मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे - तसेच सातारा, पुणे आणि रत्नागिरीला *रेड अलर्ट* देण्यात आला आहे
▪️ तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला *ऑरेंज अलर्ट* देण्यात आला आहे - औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरलाहि - येत्या पाच दिवसात चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तरी शेतकरी वरगला चांगली बात्मी आहे
*हवामान विभागाचा हा अलर्ट* - प्रत्येक शेतकऱ्यांसाठी नक्कीच खुप महत्वाचा आहे -

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.