जिल्हा प्राधिकरणाकडून कोविड-19 च्या निर्बंधाबाबत शिथिलता नाही
· जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये
लातूर, दि.28(जिमाका):- जिल्ह्यात कोविड-19 च्या अनुषंगाने कोविड प्रतिबंधासाठी जिल्हा प्राधिकरणाच्या वतीने लेव्हल - ३ चे निर्बंध घालण्यात आलेले आहेत. त्यानुसार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत पूर्वी दिलेल्या आदेशानुसार आस्थापना व बाजारपेठ सुरू राहणार आहे. या नियमावलीत प्रशासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची शिथिलता देण्यात आलेली नाही. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व प्रशासनाने पूर्वी दिलेले आदेश कायम असतील, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.