*जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 20 नवीन रुग्णवाहिका दाखल होणार*
दि - 4 - उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायतीकडील 13 व्या वित्त आयोगाची शिल्लक रक्कम व चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम रुपये 5 पाच कोटी 50 लाख शासनाच्या सूचनेनुसार राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान पुणे यांच्याकडे जमा केलेली होती. सदर रक्कम यामधून उस्मानाबाद जिल्ह्यातील 16 लाख नागरिकांना रुपये 1 कोटी 50 लाखचे आर्सेनिक अल्बम 30 आणि संशमनी वटी या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्या गोळ्यांचे वाटप करण्यात आले होते तथापि उर्वरीत 4 कोटी रकमे मधून रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी मंत्री अर्थ व नियोजन तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडे निवेदन देऊन तसा प्रस्ताव अस्मिता ताई कांबळे अध्यक्ष जिल्हा परिषद उस्मानाबाद यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शासनास सादर करून आणि वारंवार पाठपुरावा करून रुग्णवाहिका खरेदी करण्यास परवानगी मिळण्याची मागणी केली होती सदर मागणी शासन स्तरावर अनेक दिवसांपासून प्रलंबित होती.
अजित पवार, मंत्री अर्थ व नियोजन तथा उपमुख्यमंत्री यांनी उस्मानाबाद येथे घेतलेल्या कोरूना काळातील आरोग्य विषयक आढावा बैठकीदरम्यान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी रुग्णवाहिका खरेदी करण्यास परवानगी मिळणे बाबत विनंती केल्यानुसार अजित पवार यांनी सदरील विषय तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही बैठकी मध्ये दिली होती. या अनुषंगाने ग्रामविकास विभागाकडून उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र साठी रुपये 320 लाख किमतीच्या 20 रुग्णवाहिका खरेदी करण्यात येणार असून यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिका अभावी होत असलेली हेळसांड दूर होईल असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता ताई कांबळे यांनी व्यक्त केला आहे कोरोना च्या अनुषंगाने ग्रामीण भागातील रुग्णांना चांगल्या प्रकारची सेवा सुविधा च्या मिळण्याच्या दृष्टीने सदरील प्रस्ताव हा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला होता व त्यांच्या प्रयत्नामुळे राज्यस्तरीय मान्यता सुलभरीत्या प्राप्त झाली आहे सदर रुग्णवाहिका खरेदी प्रक्रिया तात्काळ राबविण्यात येत असून रुग्णवाहिका विभागाकडे लवकरच सुपूर्द केल्या जाणार आहेत तेव्हा आरोग्य विभागाने वैद्यकीय अधिकारी यांनी सदरील रुग्णवाहिकेच्या वापराकरिता सुयोग्य असे नियोजन करून ग्रामीण भागातील रुग्णांना आरोग्य सेवा द्यावी असे आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष स्मिताताई कांबळे यांनी केले आहे
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* तालुका प्रतिनिधी *महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.