आमचा पक्ष कुणालाही मॅनेज नाही: जिल्हाध्यक्ष जगदीश माळी
औसा मुख्तार मणियार
औसा:जाती पातीच्या नावावर समाजात तेढ निर्माण करून स्वताची पोळी भाजणा-या पक्षासी आमचे कधीही एकमत ह़ोणार नाही. तळागळातील जनतेला न्याय देणारा व घराणेशाहीच्या राजकारणाला तिलांजली देऊन वंचित धर्म निर्माण करणारा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी आमची कुठेही बी टिम नसुन आमचे नेते महीन्याला 100 कोटी वसुलीही करीत नाहीत. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांनी केले.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शिवरूद्र बेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आलमला येथे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेल्यांना मांन्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जगदिश माळी, उपाध्यक्ष श्याम पावले, महासचिव डॉ तात्याराव लहाने, जिल्हा संघटक सचीन लामतुरे, कामगार सेनाचे जिल्हाध्यक्ष आकाश ईगवे, उद्योजक रमेश राजे, प्रवक्ते मिर्झा पटेल, उपाध्यक्ष प्रकाश दादा कांबळे, यांच्या उपस्थितीत शाम पावले यांची वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.तसेच केदार निलंगेकर, राजकुमार गोरे, शिवानंद हुरदुळे, शिवाजी बिराजदार,आदि कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. त्याबद्दल तालुका अध्यक्ष शिवरुद्र बेरुळे यांनी अभिनंदन केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.