केंद्रिय दळणवळण व शिक्षण राज्यमंत्री ना.धोत्रे
यांच्याशी विविध प्रश्नांवरती कव्हेकरांची चर्चा
यांच्याशी विविध प्रश्नांवरती कव्हेकरांची चर्चा
लातूर दि.03/07/2021
केंद्रिय दळणवळण व शिक्षण राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांची दिल्ली येथे भेट घेवून दळणवळण विभागाला कव्हा येथे शिवाजी गृहनिर्माण संस्थेने जागा नाममात्र किंमतीत दिलेली आहे. त्या ठिकाणी टेलिफोन विभागाच्या अधिकार्यांसाठी निवास व्यवस्था करावी, अशी मागणी भाजप नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केली असता. त्यास ना.धोत्रे साहेबांनी तात्काळ संम्मती दिलेली आहे. यामुळे बी.एस.एन.एल.विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांना दिलासा मिळणार आहे.
यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी नवीन कृषी कायदा शेतकरी हिताचा व नवीन सी.बी.सी.एस.शिक्षणपद्धती बाबत चर्चा झाली. केंद्र सरकारने नवीन आणलेला कृषी कायदा हा शेतकरी हिताचा असल्याचे कव्हेकर यांनी सांगितले. तसेच नवीन सी.बी.सी.एस. शिक्षणपध्दतीमुळे भारतीय तरूणांची बेरोजगारी कमी होऊन संशोधन वाढेल. त्यामुळे या दोन्ही पध्दती देशाला प्रगतीपथावर घेऊन जाणार असल्याचेही केंद्रिय दळणवळण व शिक्षण राज्यमंत्री ना.संजय धोत्रे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
यावेळी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर स्वलिखीत विचार संवाद, स्मार्ट व्हिलेज कव्हा,कृषी कायदा व चालू विषयावरील लेखही मंत्री महोद यांना भेट स्वरूपात दिले.यावेळी जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, पी.एस.केदार बुरांडे उपस्थित होते.
दिल्ली दौरा दरम्यान भाजपा नेते तथा मजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी मा.नितीनजी गडकरी, ना.रामदास आठवले, किसान विकास मोर्च्याचेे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमारजी चहर आदी मान्यवरांच्याही भेटी घेवून त्यांच्याशीही देशातील चालू घडामोडीवर सविस्तर चर्चा केली.
----
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.