औशात लोकमतच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
औसा मुख्तार मणियार
स्वातंत्र्य संग्राम सेनानी लोकमत चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त लोकमत रक्ताचं नातं या मोहिमेअंतर्गत औसा येथील श्री मुक्तेश्वर विद्यालयात 3 जुलै शनीवार रोजी घेण्यात आलेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरामध्ये 33 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार शोभा पुजारी, पोलीस निरीक्षक शिवशंकर पटवारी, नगरसेवक समीर डेंग, श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉक्टर बसवराज पटणे, मुख्याध्यापक जलसगरे, तालुका सरसंघचालक रुपेश कारंजे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक शिवरुद्र मुर्गे, प्राध्यापक किरण दुरुगकर, गजानन शेटे, सुधीर औसेकर, प्राध्यापक हरीश पाटील, महेश स्वामी, शिवाजी भातमोडे, गिरीधर जंगाले यांची उपस्थिती होती. याप्रसंगी लोकमतचे तालुका प्रतिनिधी रमेश दुरुगकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. लातूर येथील अर्बन रक्तपेढीच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.श्री मुक्तेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा औटी, रविशंकर राचट्टे यांनी सहकार्य केले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.