-औसा-लातुर राष्ट्रीय महामार्गावर कांरजे खडी केंद्राजवळ दि.23 जुलै 2021 रोजी झालेल्या अपघातास जबाबदार गुत्तेदारावर सदोsष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष जे पी औसेकर यांनी लातूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
व तसेच कामाबाबत जय महाराष्ट्र सेनेने विविध मागण्या संदर्भात निवेदन
औसा-लातुर राष्ट्रीय महामार्गाचे काम गुत्तेदाराने इस्टेमेन्ट प्रमाणे करावे व विविध मागण्यांचे निवेदन जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने आज दि.26 जुलै 2021 सोमवार रोजी लातुर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले आहे.या निवेदनात सविस्तर वृत्त असे औसा- लातूर राष्ट्रीय महामार्ग काम गेल्या महिनाभरापासून काम चालू आहे. हे काम कोण गुत्तेदार काम करीत आहे.त्याचा बोर्ड लावणे आवश्यक असताना गुत्तेदारांने बोर्ड लावलेला नाही,व वाहन सावकाश चालवा असेही बोर्ड पण लावलेला नाही,व काम करतात, एक साईडचा रस्ता संपूर्ण खडी व मुरुम घालून रस्ता करावा पण तोही केलेला नाही व पावसामुळे या रोडवर काळी मातीमुळे चिखुल होत आहे व मोठ मोठे खड्डे होत आहे.त्यामुळे वाहनाचा अपघाताचे प्रमाण वाढले आहे.व मनासारखे कोठून कोठेही रोड फोडून अर्धवट काम इस्टेमेन्ट प्रमाणे काम होत नाही.तरी संबंधित गुत्तेदारावर कार्यवाही करावी व विषया मधील मागण्या पुढीलप्रमाणे
औसा-लातुर राष्ट्रीय महामार्गाचा गुत्तेदार कोण आहे व काम कोठून कुठपर्यंत आहेत कामाची रक्कम बोर्ड लावावे.
खड्डे बुजवून घ्यावे व एक साईडच्या कच्या रस्त्यावर मुरुम टाकावे.गाड्या सावकाश चालविणे बाबत बोर्ड लावावे.
औसा- लातूर राष्ट्रीय महामार्गावर नेहमीच ट्रॅफिक जाम होते व रोज अपघात होतात,त्यामुळे हायवे पोलिसांना पेट्रोलिंगचे व वाहन तपासणीचे आदेश द्यावेत.अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी लातूर यांना जय महाराष्ट्र सेनेच्या वतीने देण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.