औसा शहरावर आता सीसीटीव्हीची करडी नजर 25 लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी

 औसा शहरावर आता सीसीटीव्हीची करडी नजर 25 लाख रुपये खर्चासाठी प्रशासकीय मंजुरी





औसा प्रतिनिधी

 औसा नगर परिषदेच्यावतीने शहरातील मुख्य रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 25 लाख रुपये खर्चासाठी शासकीय मंजुरी मिळाली असून शहरातील मुख्य रस्त्यावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर राहणार आहे शहरातील औसा टी पॉइंट पासून लातूर वेस हनुमान मंदिर तसेच जुन्या गावातील मुख्य रस्त्यावर किल्ला मैदानापर्यंत अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ अफसर शेख यांनी दिली आहे. औसा शहराच्या मुख्य रस्त्यावर शासकीय कार्यालय सराफ व्यापारी बँका हॉस्पिटल्स किराणा कापड कृषी सेवा केंद्र अशी महत्त्वाची ठिकाणे आहेत .शहरातील वाढती रहदारी, वाहतुकीची होणारी कोंडी, ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची वर्दळ यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. अशा परिस्थितीत बेकायदेशीर कृत्य करणारे, मुलींची छेडछाड ,बेदरकारपणे वाहन चालविणे, चो-या सारखे प्रकार आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद होणार आहेत वाहतुकीची कोंडी ,चोरीची प्रकरणे, मुलींची छेडछाड अशा प्रकारास सीसीटीव्ही कॅमेरा मुळे लगाम बसण्यासाठी मदत होणार असून नगराध्यक्ष अफसर शेख यांच्या प्रयत्नामुळे या कामासाठी 25 लाख रुपये खर्चासाठ प्रशासकीय मंजुरी मिळाली असून नगराध्यक्षांनी शहराला शिस्त लावण्यासाठी मुख्य रस्ता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आणल्यामुळे पोलीस प्रशासनासह सर्वसामान्य जनतेला ही मदत होणार आहे. व्यापारी, शासकीय निमशासकीय कार्यालये, आणि वाहन चालकासह अनेकांची सोय होणार असल्याने नगराध्यक्षांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या