साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे 101 व्या सार्वजनिक जयंतीच्या अध्यक्षपदी राहुल क्षिरसागर
लातूर: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहाने प्रत्येक वर्षी सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने जयंती साजरी केली जाते. याचे औचित्य साधून आज अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा येथे समाजाचे नेते जी.ए.गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सर्वानुमते राहुल क्षिरसागर यांची 101 व्या सार्वजनिक जयंती च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीमध्ये कोरोना महामारी चे सर्व नियम पाळून ही जयंती साजरी करण्याचे ठरले आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 101 व्या जयंतीचे पुढील प्रमाणे कार्यकारणी:- कार्याध्यक्ष विकास कांबळे,सुनील बसपुरे, महादेव रसाळ, आनंदभाई वैरागे, अशोक देडे, सचिव- आदर्श उपाध्ये, पिराजी साठे,उपाध्यक्ष- रवी पेठाडे, बापुसाहेब मगर, नूतन हनुमंते,आशुतोष कांबळे, स्वागताध्यक्ष-जी.ए.गायकवाड, कैलास कांबळे, गोरोबा लोखंडे, अनिल शिंदे, सचिन मस्के, सहसचिव-विष्णू कांबळे,राज क्षिरसागर, रवी कदम,कोषाध्यक्ष- शामभाऊ चव्हाण,सदस्य- राहुल गायकवाड, अजय कांबळे, ईश्वर गव्हाणे,राम कसबे,शिवनाथ काळे आदींची सर्वानुमते या बैठकीत निवड करण्यात आली असून निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र स्वागत केले जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.