राष्ट्रीय समाज पक्षाच्या रास्तारोकोमध्ये जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा सहभाग
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
लातूर/प्रतिनिधी:राज्य सरकारच्या ओबीसी राजकीय आरक्षण विरोधी धोरणाच्या निषेधार्थ राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा.विष्णू गोरे यांच्या नेतृत्वात रविवारी (दि.४ जुलै ) लातूर येथे शिवाजी चौकात रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात आले.जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी यात सहभाग घेतला.
राज्य सरकारने दिलेल्या मुदतीत माहिती न दिल्याने सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली.परिणामी समाजाचा हक्क हिरावला जाणार आहे.राज्य सरकारने इंपिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात लवकरात लवकर सादर करावा, आरक्षणासंदर्भात निर्णय होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेवू नयेत,इतर मागासवर्ग आयोगाची स्थापना करून न्यायालयीन बाबींच्या पूर्ततेसाठी काम सुरु करावे,आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
रविवारी दुपारी १ वाजता जिल्हाध्यक्ष प्रा.विष्णू गोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.तत्पूर्वी अहिल्यादेवी होळकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.जिल्हाभरातून सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करून नंतर त्यांची जामिनावर मुक्तता केली.
या आंदोलनात जिल्हा संपर्कप्रमुख रामराव रोडे ,गोविंदराव नरवटे, दादासाहेब करपे,नागनाथ बोडके, धनाजी भंडारे ,संतोष हाके, लहूकांत शेवाळे, भास्कर भंडारे, बालाजी लहुरे,अशोक शिंपले, बालाजी चिंचोळे, राम भंगे, बालाजी देवकते,जकी शेख, शिवाजी हजारे,बालाजी देवकते, शेषेराव सुर्यवंशी, लातूर तालुकाध्यक्ष सुदाम पांचाळ, काशिनाथ जेटनवरे बालाजी मल्लेशे, नवनाथ भुरे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.