केळगाव प्रकरणातील खोटा अॕट्रासिटी गुन्हा तात्काळ मागे घ्यावा,जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ,छावा यांची मागणी.
शेतीच्या वादातून निलंगा तालुक्यातील केळगाव येथे लहू कांबळे व जोतिराम पाटील यांच्यात किरकोळ वाद झाला असताना कांबळे लहू यांनी स्वतःच दगडाने मारून घेऊन स्वतःला जखमी करून घेतले त्याचा व्हिडीओ पण उपलब्ध आहे.जातीवाचक शिवीगाळ केली नसतानाही या प्रकरणाला वेगळे जातीय वळण देऊन अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज केला व याची पूर्ण शहानिशा न करता अट्रोसिटी चा गुन्हा दाखल करण्यातआला असून तो त्या कुंटुबावर अन्यायकारक आहे तरी पोलिस प्रशासने या प्रकरणाची परत एकदा सविस्तर शाहनिशा करून तात्काळ अॕट्रासिटीच्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. तो गुन्हा मागे घ्यावा बाकी योग्य तो न्याय कोर्ट देईल तो सर्व मान्य असेल परंतु आता त्या कुंटुबावर अन्याय होऊ नये असे यासाठी मराठा संघटनानी निवेदन दिले असून या निवेदनावर जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष रंजना चव्हाण, जिल्हा सचिव समाधानताई माने, मराठा सेवा संघाचे जिल्हाकार्याध्यक्ष जाधव एम एम तालुका अध्यक्ष हंसराज भोसले, संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष प्रमोद कदम, सल्लागार ऍड तिरुपती शिंदे,पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद जिल्हाध्यक्ष जाधव ज्ञानेश्वर, अंकुशजी शेळके छावा जिल्हा कार्याध्यक्ष,सूर्यवंशी सर,डिगोळे सर, चिंचकोटे सर,प्रकाश जाधव यांच्या स्वाक्षरी आहेत हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे यावर योग्य ती कार्यवाही नाही झाल्यास आंदोलन करण्यात येईल
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.