उस्मानाबाद जिल्ह्यातील आरोग्य सेवा सुधारण्यासाठी नविन 29 आयुष्यमान रुग्णालये, आवश्यक उपकरणे, रुग्णालयासाठी आवश्यक असणारे उपकरणा बरोबरच कर्मचाऱ्यांना निवासाच्या संदर्भात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांची #नवी_दिल्ली येथिल कार्यालयात भेट घेऊन विनंती केली. *अल्ताफ शेख, प्रतिनिधी उस्मानाबाद*,
प्रथमतः खा.डॉ.भारती पवार यांची केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
उस्मानाबाद जिल्हा भारत सरकारने घोषित केलेल्या जिल्हा नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत आहे. जिल्ह्यात आरोग्याची गैरसोय होत असून या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्याची गैरसोय व समस्या कमी करण्यासाठी आरोग्य सेवा सुधारण्याठी केंद्र सरकारने जिल्ह्यात नविन 29 आयुष्यमान रुग्णालये स्थापन करावीत. रुग्णालयासाठी आवश्यक असणारे उपकरणा बरोबरच कर्मचाऱ्यांना निवास करणे आवश्यक असून त्या सर्व इमारती करण्यासाठी 15453.54 रु.लक्ष आवश्यक निधी न देता सन-2021-22 मध्ये 2088.46 लक्ष निधी देण्याची घोषणा केली असून ती फार कमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्याची गैरसोय कमी करण्यासाठी अधिकचा निधी जिल्ह्यास देण्यात यावा. अशी विनंती केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.