*निर्बंध काही प्रमाणात शिथिल?*
⭕मुख्यमंत्र्यांची वैद्यकीय तज्ज्ञांशी चर्चा......
*अल्ताफ शेख, प्रतिनिधी/ उस्मानाबाद*,
मुंबई : करोना रुग्णसंख्या घटल्याच्या पाश्र्वभूमीवर १ ऑगस्टपासून राज्यातील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहमती झाली.
यानुसार दुकानांच्या वेळा वाढवून दिल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तज्ञांचा समावेश असलेल्या कृतिदलाच्या सदस्यांबरोबर चर्चा केल्यावर अंतिम निर्णय घेणार आहेत.
दिल्ली, कर्नाटक आदी राज्यांनी निर्बंध शिथिल केले आहेत.
राज्यात रुग्णसंख्या आणि संसर्गदर कमी झाल्याने निर्बंध शिथिल केले जावेत,
अशी मागणी बहुतेक मंत्र्यांनी केली.
यानुसार येत्या १ तारखेपासून सध्या लागू असलेले र्निबध काही प्रमाणात शिथिल केले जातील.
सध्या सायंकाळी ४ पर्यंत दुकाने खुली ठेवण्यास परवानगी आहे.
ही वेळ सायंकाळी ७ पर्यंत वाढविली जाण्याची शक्यता आहे.
दुकाने आणि उपहारगृहांच्या वेळेत वाढ करावी ही मागणी मंत्र्यांनी केली.
राज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णांची संख्या घटली आहे.
मृत्यूदरही जूनमधील २.३८ टक्क्यांवरून १.२४ टक्के इतका कमी झाला आहे.
उपचाराधीन रुग्णांची संख्याही ८२ हजारांवर आली आहे.
ही घट ७२.८८ टक्के आहे.
पुणे, ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या पाच जिल्ह्य़ांत ४९ हजार रुग्ण आहेत.
तर मुंबई, अहमदनगर, सोलापूर, बीड, रत्नागिरी या पाच जिल्ह्य़ांत २० हजार ३८६ रुग्ण आहेत.
अशारितीने एकूण १० जिल्ह्य़ांत राज्यातील एकूण ८२ हजार सक्रीय रुग्णांपैकी ६९ हजार ६०८ रुग्ण आहेत.
म्हणजेच राज्यातील सक्रीय रुग्णांच्या ८४ टक्के रुग्ण हे या १० जिल्ह्य़ांत आहेत, अशी माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली.
तसेच हे १० जिल्हे व उस्मानाबादमध्ये रुग्णवाढीचा साप्ताहिक दर ०.१० टक्के व त्यापेक्षा अधिक आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.